Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी भाडेतत्त्वावर वाहने; ‘पादचारी प्रथम’ अभियानाला आणखी वेग

अतिक्रमणमुक्त फुटपाथ यासाठी पादचारी प्रथम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात येत असून जप्त केलेले साहित्य पालिकेच्या गोदामात पर्यंत घेऊन जाण्यासाठी वाहनांची गरज भासते.
Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी भाडेतत्त्वावर वाहने; ‘पादचारी प्रथम’ अभियानाला आणखी वेग
Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी भाडेतत्त्वावर वाहने; ‘पादचारी प्रथम’ अभियानाला आणखी वेग 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : अतिक्रमणमुक्त फुटपाथ यासाठी पादचारी प्रथम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात येत असून जप्त केलेले साहित्य पालिकेच्या गोदामात पर्यंत घेऊन जाण्यासाठी वाहनांची गरज भासते. यासाठी मुंबई महापालिका आता ७६ वाहने भाडेतत्त्वावर घेणार आहे.

महापालिकेच्या परवाना विभागामार्फत अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी कामगारांसह विशेष वाहने भाडेतत्त्वावर घेतली जातात. यापूर्वी शहर विभागासाठीची वाहन सेवा ९ जुलै २०२६ रोजी तर पश्चिम उपनगरातील सेवा २४ जुलै २०२६ रोजी संपुष्टात आली. त्यामुळे शहर व पश्चिम उपनगरांतील अतिक्रमणे, विशेषतः फेरीवाल्यांवरील कारवाई सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एक वर्षासाठी वाहन सेवा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याअंतर्गत शहर भागासाठी २७ वाहने, तर पश्चिम उपनगरासाठी ४९ वाहने भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहेत. शहर भागासाठी वर्षभरात ९,५५५ फेऱ्या, तर पश्चिम उपनगरासाठी १७,८५५ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक फेरीसाठी शहर विभागात ३,०५० रुपये, तर पश्चिम उपनगरात ३,०४२ रुपये खर्च अपेक्षित आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in