मुंबईला मिळणार धो-धो पाणी; १२४ किमीच्या जुन्या जलवाहिनी बदलणार; १३२ किमीच्या नवीन जलवाहिनीचे जाळे विस्तारणार

मुंबईला सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेच्या जलविभागाने जलवाहिनी बदलणे व नवीन टाकणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. १२४.६८ किमीच्या जुन्या जलवाहिनी बदलण्यात येणार आहेत, तर १३२.७० किमीच्या नवीन जलवाहिनीचे जाळे विणले जाणार आहे.
मुंबईला मिळणार धो-धो पाणी; १२४ किमीच्या जुन्या जलवाहिनी बदलणार; १३२ किमीच्या नवीन जलवाहिनीचे जाळे विस्तारणार
मुंबईला मिळणार धो-धो पाणी; १२४ किमीच्या जुन्या जलवाहिनी बदलणार; १३२ किमीच्या नवीन जलवाहिनीचे जाळे विस्तारणारप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईला सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेच्या जलविभागाने जलवाहिनी बदलणे व नवीन टाकणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. १२४.६८ किमीच्या जुन्या जलवाहिनी बदलण्यात येणार आहेत, तर १३२.७० किमीच्या नवीन जलवाहिनीचे जाळे विणले जाणार आहे. जलवाहिनी बदलल्यानंतर मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मोकड सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे मुंबईपासून १२० किलोमीटर अंतरावर आहेत. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो.‌ ब्रिटिशकालीन जलवाहिनी बदलणे व नवीन टाकणे ही कामे सन २०२६-२७ मध्ये हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, नवीन जलवाहिनीचे जाळे विकसित करणे, जुन्या जलवाहिनी बदलणे याची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

ही कामे होणार

  • जुन्या जलवाहिन्या बदलणे - २०२६-२७: १२४.६८ कि.मी.

  • नवीन जलवाहिन्या टाकणे - २०२६-२७: १३२.७० कि.मी.

  • झडपांच्या कक्षांची दुरुस्ती व पुनर्बांधकाम - २०२६-२७: २५११ नग

  • सेवा जलजोडण्यांचे नूतनीकरण - २०२६-२७: ६२ हजार ९८९ नग

  • सेवा जलजोडण्यांचे जुडगे काढणे - २०२६-२७: १२००० नग

विविध कामांमुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रकार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या तसेच मुंबईतील जलवाहिन्यांचे नेटवर्क हे सहा हजार किलोमीटरचे असून ब्रिटिशकालीन आहे. या जलवाहिन्यांचे आयुर्मान संपले की जलवाहिनी बदलणे, दुरुस्ती करणे गरजेचे असते. तसेच मुंबई मेट्रो, रस्ते अशी विविध प्राधिकरणाची कामे सुरू असून अशा कामातही जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले जाते, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in