Mumbai : उंदीर, कुत्रे, मांजरे, कीटकांना दरवाजाबाहेरच रोखणार; ११ रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी १३.६० कोटींचा खर्च

उंदीर, कुत्रे, मांजर कीटक यांचा उपद्रव रोखण्यासह रुग्णांना त्रास होऊ नये, यासाठी आता पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. उपनगरीय रुग्णालयात स्वच्छतेसाठी १३.६० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी कंत्राट देण्यात असून रुग्णालय व परिसरात रुग्णांना त्रास होऊ नये याची दक्षता संबंधित कंत्राटदाराने घ्यावी, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
उंदीर, कुत्रे, मांजरे, कीटकांना दरवाजाबाहेरच रोखणार; ११ रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी १३.६० कोटींचा खर्च
उंदीर, कुत्रे, मांजरे, कीटकांना दरवाजाबाहेरच रोखणार; ११ रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी १३.६० कोटींचा खर्च
Published on

मुंबई : उंदीर, कुत्रे, मांजर कीटक यांचा उपद्रव रोखण्यासह रुग्णांना त्रास होऊ नये, यासाठी आता पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. उपनगरीय रुग्णालयात स्वच्छतेसाठी १३.६० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी कंत्राट देण्यात असून रुग्णालय व परिसरात रुग्णांना त्रास होऊ नये याची दक्षता संबंधित कंत्राटदाराने घ्यावी, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

केईएम, सायन, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयासह उपनगरीय रुग्णालयात रुग्ण मोठ्या विश्वासाने उपचारासाठी धाव घेत असतात. स्वस्त व योग्य उपचार मिळत असल्याने रुग्ण पालिकेच्या रुग्णालयांना पसंती देतात. मात्र रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्याला अधिक धोका निर्माण होतो. तर उंदराने नवजात बाळांना कुरतडल्याचे प्रकार रुग्णालयात घडले असून रुग्णाच्या बेडवर श्वान आराम करत असल्याचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेने पश्चिम उपनगरातील ६ आणि पूर्व उपनगरातील ५ अशा एकूण ११ रुग्णालयांतील स्वच्छतेसाठी नव्याने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.

कंत्राटी कामगारांची बायोमेट्रिक हजेरी !

या नव्या करारानुसार ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, कॉर्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर रुग्णालयातील शौचालयांवर ‘लास्ट क्लिनिंग टाइम’ नोंदवणे आवश्यक असेल, जेणेकरून स्वच्छतेवर नियमित देखरेख ठेवता येईल. ऑपरेशन थिएटर आणि आयसीयूची स्वच्छता व्हॅक्यूम गनच्या सहाय्याने करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

कर्मचारी गैरहजर असल्यास दररोज १ हजारांचा दंड

कंत्राटी कामगार ड्युटीवर असताना गणवेशात व ओळखपत्रासह उपस्थित राहणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. एखादा कर्मचारी आपल्या शिफ्टमध्ये गैरहजर राहिल्यास ठेकेदाराला प्रतिदिन १,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in