

मुंबई : पाऊस व पावसाळ्यात पाणी उपसा करण्यासाठी जागोजागी बसवण्यात आलेले पंपिंग स्टेशन याची अपडेट माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला मिळावी यासाठी पालिका मुख्यालयासह परळ येथील नियंत्रण कक्षाला अपडेट माहिती मिळावी यासाठी व्हिडीओ वॉल हायटेक करण्यात येणार आहे यासाठी मुंबई महापालिका तब्बल ५ कोटी १० लाख ६८ हजार रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, मे. फॅक्सॉनिक्स टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीची शिफारस पालिका प्रशासनाने केली आहे.
सध्या नियंत्रण कक्षात २०१६ मध्ये उभारण्यात आलेल्या डीएलपी प्रोजेक्टर तंत्रज्ञानावरील व्हिडीओ वॉलचा वापर केला जात आहे. गेल्या नऊ वर्षांपासून ही यंत्रणा २४ विविध यंत्रणांवर एकाच वेळी लक्ष ठेवण्यास मर्यादा येतात.
महापालिकेच्या पहिल्या आणि तास कार्यरत असल्याने तिचे आठही पॅनेल जीर्ण झाले आहेत. परिणामी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण अस्पष्ट दिसत असून, दुसऱ्या टप्प्यातील मिळून सुमारे ९,७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे प्रक्षेपण या व्हिडीओ वॉलवर उपलब्ध आहे. मात्र, एका वेळी केवळ ५० ते ६० कॅमेऱ्यांचे चित्रण पाहता येते. त्यामुळे नवीन मोठ्या आकाराची व आधुनिक तंत्रज्ञानाची व्हिडीओ वॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तीन कंपन्यांनी दिला प्रतिसाद
या कामासाठी पोर्टलवर ई-निविदा मागविण्यात आली होती. त्याला फॅक्सॉनिक्स टेक्नॉलॉजीज, पिनॅकल इंडिया व स्टार इलेक्ट्रिकल या तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला. पालिकेचा वस्तू व सेवाकर वगळून ५ कोटी ८२ लाख ४९ हजार रुपये होता. त्यापैकी फॅक्सॉनिक्स टेक्नॉलॉजीजने ४ कोटी २१ लाख १४ हजार ४६४ रुपयांचा सर्वांत कमी दर दिला.
पाऊस, पंपिंग स्टेशनवर एकाच वेळी लक्ष
नवीन व्हिडीओ वॉलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रणासोबत भारतीय हवामान खात्याचे संकेतस्थळ, डॉपलर रडार, पालिकेची भौगोलिक माहिती प्रणाली, आपत्कालीन व्यवस्थापनाचे संकेतस्थळ, पर्जन्य जलवाहिन्यांवरील उदंचन संचांचे कामकाज व पंपिंग स्टेशनची सद्यस्थिती एकाच वेळी पाहता येणार आहे. त्यामुळे अतिवृष्टी, पूरस्थिती, कोंडी किंवा अन्य आपत्तीच्या वेळी यंत्रणांना तातडीने सूचना देत समन्वय साधणे शक्य होणार आहे.