Mumbai : पाणी माफियांना चाप; सर्वांना पाणी धोरणाच्या अंमलबजावणीला वेग, चार वर्षांत २९ हजार कुटुंबीयांना कनेक्शन

सर्वांना पाणी योजने अंतर्गत जून २०२२ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत तब्बल २८ हजार ७७४ कुटुंबीयांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत.‌ मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत नळ जोडणी देण्यात येत असल्याने पाणी माफियांना चाप बसवण्यात यश येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Mumbai : पाणी माफियांना चाप; सर्वांना पाणी धोरणाच्या अंमलबजावणीला वेग, चार वर्षांत २९ हजार कुटुंबीयांना कनेक्शन
Mumbai : पाणी माफियांना चाप; सर्वांना पाणी धोरणाच्या अंमलबजावणीला वेग, चार वर्षांत २९ हजार कुटुंबीयांना कनेक्शनप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : सर्वांना पाणी योजने अंतर्गत जून २०२२ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत तब्बल २८ हजार ७७४ कुटुंबीयांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत.‌ मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत नळ जोडणी देण्यात येत असल्याने पाणी माफियांना चाप बसवण्यात यश येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेने १ मे २०२२ पासून 'सर्वांना पाणी' धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या धोरणानुसार मुंबईतील झोपडपट्ट्यांतून जलजोडण्यासाठी अर्ज केले जात आहेत. मुंबई भरातून शेकडो अर्ज पालिकेकडे आले आहेत. सर्वांसाठी पाणी मिळावे यासाठी पाणी हक्क समितीकडून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला जातो आहे.

पाणी माफियांनी घेतला होता फायदा

यापूर्वी अवैध झोपडपट्ट्या, रस्ते आणि पदपथांवरील झोपड्या, केंद्र सरकारच्या भूखंडावरील झोपडपट्ट्या यांना अधिकृत जलजोडण्या दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे या वर्गाला पाणी विकत घ्यावे लागत होते. दहा ते वीस लिटरच्या कॅनसाठी ५० ते १०० रुपये मोजावे लागतात. याचा फायदा झोपडीदादा आणि पाणी माफियांनी उठवला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in