मुंबई धमक्यांनी हादरली! महापौर कार्यालय, अमिताभ यांचे निवासस्थान, शैक्षणिक संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई महापौर कार्यालयासह बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान आणि गायक दलजीत दोसांझच्या संगीत मैफिलीच्या (कॉन्सर्ट) ठिकाणी तसेच काही शैक्षणिक संस्थांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा एक ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलिसांनी चक्रे फिरविली असून सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
मुंबई धमक्यांनी हादरली! महापौर कार्यालय, अमिताभ यांचे निवासस्थान, शैक्षणिक संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
मुंबई धमक्यांनी हादरली! महापौर कार्यालय, अमिताभ यांचे निवासस्थान, शैक्षणिक संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : मुंबई महापौर कार्यालयासह बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान आणि गायक दलजीत दोसांझच्या संगीत मैफिलीच्या (कॉन्सर्ट) ठिकाणी तसेच काही शैक्षणिक संस्थांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा एक ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलिसांनी चक्रे फिरविली असून सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एक ई-मेल पाठवण्यात आला होता. या ईमेलमध्ये त्यांच्या कार्यालयाला, अमिताभ बच्चन यांच्या घराला आणि दिलजित दोसांझच्या कॉन्सर्टच्या ठिकाणाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली होती. या ईमेलची प्रत उपमहापौर संजय घडी यांनाही पाठवण्यात आली होती. धमकीचा ईमेल मिळताच पोलिसांच्या पथकाने आणि सुरक्षा यंत्रणांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर कार्यालयाची कसून तपासणी केली, मात्र तेथे कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. ३१ ऑक्टोबर रोजी एका शाळेवर ग्रेनेड हल्ला केला जाईल, अशी धमकीही या मेलमध्ये देण्यात आली आहे.

खलिस्तानचा उल्लेख

३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान जूहू येथील अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' या बंगल्याला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात होणाऱ्या गायक दिलजित दोसांझच्या कॉन्सर्टदरम्यान हल्ला केला जाईल, असा दावाही या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या मेलमध्ये 'खलिस्तान'चा उल्लेख करण्यात आला आहे.

सुरक्षा यंत्रणा सतर्क

या धमकीच्या ई-मेलमुळे कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. या संदेशाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी, त्याचा उगम शोधण्यासाठी आणि तो पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. सुरक्षेचा एक उपाय म्हणून महापौर कार्यालय, महालक्ष्मी रेसकोर्स परिसर, शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्था आणि ई-मेलमध्ये नमूद केलेल्या इतर सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा आणि पाहणी वाढवण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in