मुंबई पुस्तक महोत्सवात मराठीचा बोलबाला; २४ नोव्हेंबरपासून सहा दिवस पर्वणी; मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात आयोजन

वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि साहित्यविश्वातील लेखक, कवी, विचारवंत व वाचकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी मुंबई पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई पुस्तक महोत्सवात मराठीचा बोलबाला; २४ नोव्हेंबरपासून सहा दिवस पर्वणी; मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात आयोजन
मुंबई पुस्तक महोत्सवात मराठीचा बोलबाला; २४ नोव्हेंबरपासून सहा दिवस पर्वणी; मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात आयोजनसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि साहित्यविश्वातील लेखक, कवी, विचारवंत व वाचकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी मुंबई पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये हा महोत्सव रंगणार आहे. सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत पुस्तकप्रेमींना महोत्सवाला भेट देणार असून यात मराठीसाठी स्वतंत्र दालन आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने लेखक आणि वक्त्यांसाठी स्वतंत्र कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ‘ऑथर्स अँड स्पीकर्स’ या विशेष उपक्रमातून साहित्यिकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. साहित्यिक चर्चा, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुस्तक प्रदर्शन ही महोत्सवाची प्रमुख आकर्षणे असतील. मुलांसाठी कथाकथन, प्रश्नमंजुषा, स्पर्धा आणि साहित्यविषयक उपक्रमांचे स्वतंत्र आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजक तथा मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले.‌

लेखक, नाटककारांची उपस्थिती

प्रसिद्ध साहित्यिक अरुणा ढेरे, लेखक शरणकुमार लिंबाळे, अभिनेते-दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी आणि नाटककार अभिराम भडकमकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती महोत्सवात असणार आहे. तसेच गायिका वैशाली सामंत यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळा २४ नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता होणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून (सांताक्रूझ बाजूने) नागरिकांना प्रवेश करता येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)