Mumbai : बोरिवलीतील स्कायवॉकला जोडणार सरकता जिना; गरोदर महिला, ज्येष्ठांना दिलासा

बोरिवली कराच्या सोयीसाठी आता बोरिवली स्टेशन ते गोरा गांधी रुग्णालयापर्यत ये-जा करणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
Mumbai : बोरिवलीतील स्कायवॉकला जोडणार सरकता जिना; गरोदर महिला, ज्येष्ठांना दिलासा
Mumbai : बोरिवलीतील स्कायवॉकला जोडणार सरकता जिना; गरोदर महिला, ज्येष्ठांना दिलासा (प्रातिनिधिक छायाचित्र)
Published on

मुंबई : बोरिवली कराच्या सोयीसाठी आता बोरिवली स्टेशन ते गोरा गांधी रुग्णालयापर्यत ये-जा करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. बोरिवली स्टेशनसमोरील गोरा गांधी रुग्णालयापर्यंत थेट स्कायवॉकने जोडण्यात येणार आहे. सरकता जिना बसवल्यानंतर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकता जिना बसवणे चांगली गोष्ट आहे, परंतु वाकोला येथील स्कायवॉक पूर्ण होण्यास ८ वर्षे लागली आणि आजही स्कायवॉकवर छप्पर नाही, त्यामुळे लोकांना उन्हाळ्यात पावसाळ्यात स्कायवॉकचा तसा उपयोग होत नाही, असा सवाल करत बोरिवली येथील स्कायवॉकला लागून सरकता जिना बसवण्याचे काम किती दिवसांत पूर्ण होईल, अशी विचारणा काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी केली. दरम्यान, प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले आणि प्रस्ताव मंजूर केला.

गैरसोय टळणार

बोरिवली रेल्वे स्थानकाला जोडलेल्या स्कायवॉकवर मोठी वर्दळ असते. मात्र, या ठिकाणी सरकता जिना नसल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने आता या स्कायवॉकला जोडणारा सरकता जिना बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांतर्गत सुमारे ८ मीटर उंचीचा उच्च क्षमतेचा सरकता जिना बसवण्यात येणार असून त्यावर संरक्षक छप्परही उभारण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in