मुंबईतील पुलांची होणार पुनर्बांधणी

मुंबईतील पुलांची होणार पुनर्बांधणी
Published on

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी, मुंबईकरांना मजबूत व टिकाऊ पूल देण्यासाठी चार नवीन तर दोन पुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. माझगाव-सँडहर्स्ट रोड दरम्यानचा हँकॉक पूल, दहिसर येथील कॉम्प्लेक्स ब्रीज, पोयसर नदीवरील लिंक रोडला जोडणारा पूल, अंधेरी येथील तेली गल्ली फ्लायओव्हर, दहिसर सिमेंट्री आणि बोरिवली येथील कोरा केंद्र पूल लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या सगळ्या पुलांच्या कामावर मुंबई महापालिका तब्बल ४१७ कोटी रुपये खर्च करणार आहे.

महाड येथील सावित्रीबाई फुले पूल, अंधेरी स्थानकाजवळील गोखले पूल ३ जुलै, २०१८ रोजी कोसळला होता. या दुर्घटनेत दोन जण दगावले होते. तर सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल १४ मार्च २०१९ कोसळला होता. या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांचे ऑडिट करण्यात आले होते. ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर काही पुलांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. तर ३०-४० वर्षे जुने झालेले पूल पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सद्य:स्थितीत चार पूल नवीन बांधण्यात येणार असून दोन पुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in