
मुंबई : दुबईस्थित गुंतवणूक कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतील एका व्यावसायिकाला तब्बल ५.२४ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या चार सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.
आरोपींनी पीडित व्यावसायिकाला दुबईला बोलावले होते. मात्र तेथे गेल्यावर त्याला अशी कोणतीही कंपनी अस्तित्वातच नसल्याचे आढळले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे या व्यावसायिकाच्या लक्षात आले.
चौकशीत उघड झाले की, अलीकडे देशाच्या विविध भागांतून पकडलेल्या या आरोपींनी याच पद्धतीने बंगळुरू, चेन्नई, मुंबई, पुणे आणि केरळ येथे ६५ कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केली आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, तिघा आरोपींची ओळख पटली असून त्यात आर. मेनन (३५), मणिकंदन (३२) आणि एच. पांडी यांचा समावेश आहे. यातील एक आरोपी अद्याप फरारी असून पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.