Mumbai : मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर 'इमर्जन्सी मेडिकल रूम'

प्रवासादरम्यान रेल्वे आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय नेटवर्कवरील ४३ स्थानकांवर 'इमर्जन्सी मेडिकल रूम' (ईएमआर) उभारण्याची योजना आखली आहे. यासाठी १८ ते २३ सप्टेंबरदरम्यान एकत्रित ई-लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे.
Mumbai : मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर 'इमर्जन्सी मेडिकल रूम'
Mumbai : मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर 'इमर्जन्सी मेडिकल रूम''एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

अभिषेक पाठक/मुंबई

प्रवासादरम्यान रेल्वे आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय नेटवर्कवरील ४३ स्थानकांवर 'इमर्जन्सी मेडिकल रूम' (ईएमआर) उभारण्याची योजना आखली आहे. यासाठी १८ ते २३ सप्टेंबरदरम्यान एकत्रित ई-लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे.

डोंबिवली ते सीएसएमटी प्रवास करणारे प्रवासी सचिनकुमार मौर्य यांनी डोंबिवली स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्षाची मागणी करत मध्य रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. कल्याण येथील मध्य रेल्वे रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाने ११ सप्टेंबरला दिलेल्या उत्तरात सध्याच्या सुविधा आणि आगामी विस्ताराची सविस्तर माहिती दिली. सध्या मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर १२ आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कार्यरत आहेत. यातील कल्याण, भायखळा आणि वाशी येथील ३ कक्ष वैद्यकीय विभागामार्फत चालवले जातात, जिथे 'अॅनी फाऊंडेशन' ऑगस्ट २०२२ पासून सेवा देत आहे. उर्वरित ९ कक्ष -कर्जत, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर, ठाणे, भांडुप, कांजूरमार्ग, डोंबिवली आणि टिटवाळा येथे असून ते व्यावसायिक विभागामार्फत चालवले जातात.

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न

उपनगरीय रेल्वेवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना ही पावले उचलली जात आहेत. मुख्य मार्गिकेवर चालत्या लोकलमधून प्रवासी खाली पडण्याच्या घटनांमध्ये २५० टक्क्यांनी वाढ झाली. हार्बरवर अशा घटनांमध्ये घट झाली तर पश्चिम रेल्वेवर कोणताही बदल झालेला नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in