Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉक

अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला आहे.
Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉक
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी-नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या 'डाऊन धीम्या' मार्गावरील गाड्यांना माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड स्थानकाजवळ त्यांना पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि त्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक

ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. त्यानंतर माटुंगा स्थानकावर त्यांना पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. यामुळे या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

पश्चिम रेल्वेवर नाइट ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री कांदिवली ते बोरिवली दरम्यान अप-डाऊन जलद आणि धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून ते रविवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत असेल तर अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १ वाजल्यापासून ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत असेल. धीम्या मार्गावरील ब्लॉकच्या कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व लोकल गोरेगाव ते बोरिवली दरम्यान जलद मार्गावरून धावतील. डाऊन जलद मार्गावरील ब्लॉकच्या वेळी फलाट उपलब्ध नसल्यामुळे डाऊन दिशेकडील लोकल राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकांवर थांबणार नाहीत. कारण या लोकल अंधेरी ते बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गावरून चालवल्या जातील.

ट्रान्स हार्बरचे वेळापत्रक

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी-नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत वाशी-नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी-नेरूळ-पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा तसेच पनवेल-नेरूळ-वाशी येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

logo
marathi.freepressjournal.in