Mumbai : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मध्यरात्रीचा ब्लॉक; हार्बर मार्गावर रविवारी दिवसाचा मेगाब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गांवर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान मेन लाइनवर विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे, तर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी-वांद्रे स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर दिवसाचा मेगा ब्लॉक घेतला आहे.
Mumbai : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मध्यरात्रीचा ब्लॉक; हार्बर मार्गावर रविवारी दिवसाचा मेगाब्लॉक
Published on

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गांवर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान मेन लाइनवर विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे, तर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी-वांद्रे स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर दिवसाचा मेगा ब्लॉक घेतला आहे.

शनिवारी मध्यरात्री भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान मेन लाइनवर मध्यरात्रीचा विशेष ब्लॉक असेल. भायखळा ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्री १२.४५ ते पहाटे ३.४५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. शीव येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाशी संबंधित या विशेष ब्लॉकमुळे शनिवारी मध्यरात्री रात्री १२.१० ते पहाटे ४.१० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे 'डाऊन हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 'अप' हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत सुटणाऱ्या वाशी/ बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ पर्यंत सुटणाऱ्या वांद्रे, गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या सीएसएमटी येथे जाणाऱ्या 'अप' हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते ५.१३ पर्यंत सुटणाऱ्या सीएमएमटीकडे जाणाऱ्या 'अप' हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल व कुर्ला दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक

पश्चिम रेल्वेद्वारे अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि ओएचई उपकरणांच्या देखभालीसाठी रविवारी वांद्रे आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वांद्रे-सीएसएमटी आणि सीएसएमटी/पनवेल-गोरेगाव-सीएसएमटी/पनवेल हार्बर मार्गावरील सर्व सेवा, तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-गोरेगाव-चर्चगेट दरम्यानच्या काही धीम्या गतीने चालणाऱ्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in