Mumbai : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर रविवारी (ता.२७) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Mumbai : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक
Mumbai : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक
Published on: 

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर रविवारी (ता.२७) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर लाइनवर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान 'ब्लॉक असेल.

मुख्य मार्गावर माटुंगा मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी १५.४५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाणे स्थानकाच्या पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.

सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या वेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील, माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

दुपारी १.४८ वाजता खोपोली येथून सुटणारी खोपोली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल आता दुपारी २.०६ वाजता सुटेल अशा प्रकारे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाइनवरील सेवा आणि सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या अप हार्बर लाइन वरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल वाशी - पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ट्रान्स-हार्बर आणि उरण पोर्ट मार्गावरील सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जातील.

ब्लॉकच्या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत हार्बर लाइनवरील प्रवाशांना ठाणे वाशी/नेरुळ स्थानकांद्वारे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in