Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे.
Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक
Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक(Photo - Kishori Ghaywat)
Published on

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी दरम्यान मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील उपनगरी गाड्या मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर थांबणार नाहीत.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वेचा नाइट ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाइन्स स्थानकातील फलाट क्रमांक ३ आणि ४ च्या दरम्यान फूटओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवण्यासाठी शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा रद्द आणि काही सेवा अंशतः रद्द राहतील. बोरिवलीहून १२.१० वाजता सुटणारी चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल स्थानकापर्यंतच धावेल. त्यामुळे, मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान ही गाडी रद्द राहील.

विरारहून ११.४९ वाजता सुटणारी चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल स्थानकापर्यंतच धावेल. बोरिवलीहून १२.३० वाजता सुटणारी चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल स्थानकापर्यंतच धावेल. विरारहून १२.५ वाजता सुटणारी चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल स्थानकापर्यंतच धावेल.

logo
marathi.freepressjournal.in