

मुंबई : चेंबूर येथील सुभाष नगर परिसरात तळ अधिक सात मजली इमारत उभारणीचे काम सुरु आहे. शनिवारी दुपारी सातव्या मजल्यावर काम सुरु असताना परांची कोसळली आणि सहाही कामगार खाली पडले. या घटनेत रामूल्ला (५५) याचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, इमारतीचे काम सुरू असताना कोणतीही दक्षता घेतलेली नव्हती. कामात निष्काळजीपणा दिसून येतो. त्यामुळे विकासक आणि कंत्राटदार दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी सूचना महापौर रितू तावडे यांनी केली. घटनास्थळी महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि त्यानंतर रुग्णालयात जोखमीची विचारपूस केली.
दुर्घटनास्थळाला महापौर, उप महापौरांची भेट
चेंबूरमधील सुभाषनगर भागात इमारतीचे बांधकाम काम सुरु असताना इमरातीच्या सातव्या मजल्यावरुन सहा कामगार खाली कोसळले. यात रामूल्ला या कामगाराचा मृत्यू झाला. चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील बांधकामाधीन असलेल्या इमारतीवरून सहा मजूर कोसळले. पैकी एकाचा मृत्यू झाला तर अन्य पाचजण जखमी झाले. शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनास्थळाला महापौर रितू तावडे यांनी तातडीने भेट दिली. तसेच घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात जाऊन जखमी मजुरांची विचारपूस देखील त्यांनी केली. यावेळी उप महापौर संजय घाडी आणि विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर हे उपस्थित होते.