Mumbai : काँक्रीट, जलवाहिनीने घेतला झाडाचा जीव; चेंबूर प्रकरणात पालिकेच्या पथकाचा प्राथमिक अंदाज

रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामादरम्यान पर्जन्य जलवाहिनी वळवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
Mumbai : काँक्रीट, जलवाहिनीने घेतला झाडाचा जीव; चेंबूर प्रकरणात पालिकेच्या पथकाचा प्राथमिक अंदाज
Mumbai : काँक्रीट, जलवाहिनीने घेतला झाडाचा जीव; चेंबूर प्रकरणात पालिकेच्या पथकाचा प्राथमिक अंदाज(Photo-X)
Published on

देवश्री भुजबळ/मुंबई:

रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामादरम्यान पर्जन्य जलवाहिनी वळवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. ज्यामुळे झाडाची मुळे मृत झाली आणि झाडाचा खड्डा व पाया आतून पोकळ झाला. झाडाच्या बुंध्याभोवती मोकळी जागा शिल्लक राहिली नव्हती, अशी माहिती पाहणीदरम्यान उपस्थित असलेल्या मुंबई मनपाच्या अधिकाऱ्याने दिली. मुंबई मनपाच्या तपास पथकाने गुरुवारी घटनास्थळाची पाहणी केली.

‘पर्जन्य जलवाहिनी वळवली आणि झाडाच्या बुंध्याभोवती काँक्रीटीकरण केले. ज्यामुळे झाडाचे आरोग्य राखण्यासाठी आजूबाजूला मोकळी जागा उरली नाही. त्यामुळे झाडाची उघडपणे मृत किंवा खराब झालेली दिसत आहेत, ज्यामुळे हे महाकाय झाड आतून कमकुवत झाले होते. तपासाचा एक भाग म्हणून, समिती चेंबूर पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवलेल्या कोसळलेल्या झाडाच्या अवशेषांचीही तपासणी करेल,’ असे त्या अधिकाऱ्याने ‘एफपीजे’ शी बोलताना सांगितले. सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसते की, ४० फूट उंच झाड एका सेकंदात कोसळले.

Mumbai : काँक्रीट, जलवाहिनीने घेतला झाडाचा जीव; चेंबूर प्रकरणात पालिकेच्या पथकाचा प्राथमिक अंदाज
Mumbai : चेंबूर बस दुर्घटनेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; अन्य चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

विहानचा शवविच्छेदन अहवाल सादर

विहानचा शवविच्छेदनाचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सादर केला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण ‘धक्का (शॉक), रक्तस्त्राव आणि एकाधिक जखमा’ असे नमूद केले. दुपारी २.५५ च्या सुमारास झाड कोसळले आणि शवविच्छेदनानुसार विहानचा जागीच मृत्यू झाला होता.

Mumbai : काँक्रीट, जलवाहिनीने घेतला झाडाचा जीव; चेंबूर प्रकरणात पालिकेच्या पथकाचा प्राथमिक अंदाज
Mumbai : विद्यार्थ्याचा करुण अंत; चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळले

चर्चगेट येथे झाड कोसळले

कमकुवत होऊन झाड कोसळण्याची आणखी एक घटना गुरुवारी पहाटे चर्चगेट स्टेशनजवळ घडली. यामुळे रस्त्यावरील काही वाहनांचे नुकसान झाले. हे झाड ‘सागर बिल्डिंग’च्या आवारात होते आणि झाडाच्या बुंध्याभोवती पेव्हर ब्लॉक बसवले होते.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in