Mumbai : चॉकलेटपासून साकारला नक्षीदार बाप्पा; ४ फूट उंच, तर ७५ किलो वजनाची मूर्ती

मुंबईतील पेस्ट्री शेफ आणि चॉकलेटीयर संकेश बंगेरा यांनी कोणत्याही साच्याचा किंवा अखाद्य (नॉन इडिबल) अंतर्गत आधाराचा वापर न करता पूर्णपणे हाताने साकारलेली ४ फूट उंच आणि ७५ किलो वजनाची गणपतीची चॉकलेटची मूर्ती तयार केली आहे.
Mumbai : चॉकलेटपासून साकारला नक्षीदार बाप्पा; ४ फूट उंच, तर ७५ किलो वजनाची मूर्ती
Mumbai : चॉकलेटपासून साकारला नक्षीदार बाप्पा; ४ फूट उंच, तर ७५ किलो वजनाची मूर्ती
Published on

एफपीजे न्यूज सर्व्हिस/मुंबई

मुंबईतील पेस्ट्री शेफ आणि चॉकलेटीयर संकेश बंगेरा यांनी कोणत्याही साच्याचा किंवा अखाद्य (नॉन इडिबल) अंतर्गत आधाराचा वापर न करता पूर्णपणे हाताने साकारलेली ४ फूट उंच आणि ७५ किलो वजनाची गणपतीची चॉकलेटची मूर्ती तयार केली आहे.

बांगेरा यांनी सांगितले की, ही गणेशमूर्ती साकारण्यासाठी त्यांना तीन दिवसांत ३६ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. बाप्पाचे सौंदर्य, सुरेख तपशील, चेहऱ्यावरील भाव आणि भव्यता कायम राखत, संपूर्णपणे केवळ चॉकलेटच्या जोरावर एवढी मोठी मूर्ती उभी करणे हे मुख्य आव्हान होते. मोठ्या आकाराच्या चॉकलेटच्या वस्तू किंवा मूर्ती बनवण्यासाठी सहसा तयार साचे वापरले जातात, परंतु बांगेरा यांनी जाणीवपूर्वक ही मूर्ती हाताने कोरणे पसंत केले. यामुळे त्यांना मूर्तीचे प्रमाण, मुद्रा आणि बारीकसारीक तपशिलांवर हवा तसा ताबा ठेवता आला.

नक्षीकाम टिकवण्यासाठी तापमानाचे नियंत्रण

‘मूर्तीचे हात, मुकुट, दागिने आणि बाहेर आलेले भाग बनवणे विशेष कठीण होते, कारण त्यामुळे बाहेरील बाजूस वजन वाढते. प्रत्येक भाग जोडून तो स्थिर होईपर्यंत पुढील काम थांबवावे लागत होते. कोनात झालेला एक छोटासा बदलही संपूर्ण मूर्तीच्या तोलावर परिणाम करू शकत होता.’ तापमानाचे नियंत्रण हे आणखी एक आव्हान होते. मानवी शरीराची उष्णता आणि सभोवतालच्या तापमानामुळे चॉकलेट लगेच मऊ पडते, तरीही मूर्तीचा आकार आणि त्यावरील बारीक नक्षीकाम टिकवून ठेवण्यासाठी चॉकलेट पुरेसे घट्ट राहणे गरजेचे होते.

योग्य रचनेचे नियोजन

मूर्तीचा आकार जसजसा वाढत गेला तसतसे बदलत्या प्रमाणानुसार बंगेरा यांना काही भाग पुन्हा पुन्हा आकारावे व सुधारावे लागले. ‘हे फक्त चॉकलेट साच्यात ओतणे नव्हते; तर चॉकलेट या घटकाचे स्वरूप समजून घेऊन, योग्य रचनेचे नियोजन करत कलाकृती साकारणे होते,’ असे त्यांनी सांगितले.

दुधात केले विसर्जन

उत्सवाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी (१८ सप्टेंबर) दुधात विसर्जन करण्यापूर्वी या मूर्तीची एका आऊटलेटवर पूजा करण्यात आली. या गणपतीचे गरम दुधात विसर्जन करून भाविकांना ‘चॉकलेट मिल्कशेक्स’च्या स्वरूपात त्याचा प्रसाद वाटण्याचे नियोजन करण्यात आले होते. काहीतरी वेगळे आणि अनन्यसाधारण निर्मिती करण्याचा हा प्रयत्न होता. दरम्यान, इतर चॉकलेटच्या मूर्ती बनवताना साचे वापरले जातात. मला कोणत्याही साच्याशिवाय, केवळ हाताच्या कौशल्याने गणपतीची ही भव्य कलाकृती साकारण्याची संधी शोधायची होती, असे बंगेरा म्हणाले.

मूर्तीच्या रचनेचे मोठे आव्हान

या कामातील दुसरे मोठे आव्हान म्हणजे मूर्तीची रचना. कोणत्याही आधाराशिवाय ही मूर्ती उभी करण्यात आल्याने, चॉकलेटला स्वतःचे वजन पेलणे आवश्यक होते. ‘तोल, गुरुत्वाकर्षण, वजनाचे संतुलन लक्षात घेऊन नियोजन करावे लागले. जर एखादा भाग जास्त जड झाला असता, तर त्याचा दबाव दुसऱ्या भागावर येऊन त्या ठिकाणी तडे जाण्याचा धोका होता.’

logo
marathi.freepressjournal.in