कचरामुक्तीच्या दिशेने मुंबई शहराचे पाऊल

१० वर्षांत ‘कचरामुक्त मुंबई’ यासाठी ही संकल्पना राबवण्यात येत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने दिली
कचरामुक्तीच्या दिशेने मुंबई शहराचे पाऊल
Published on

मुंबई शहर कचरामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबई कचरा मुक्तीसाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यात आले आहे. पुढील १० वर्षांत ‘कचरामुक्त मुंबई’ यासाठी ही संकल्पना राबवण्यात येत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने दिली.

डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आल्याने भविष्यात कचऱ्याची विल्हेवाट लावायची यावर मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मुंबई जमा होणाऱ्या कचऱ्याची आहे. त्याच ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी प्लॅन तयार केला आहे.‌ मुंबईतील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर हा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर नेण्यात येतो. मात्र त्याची अंमलबजावणी नीट होत नसल्याचे समोर आले आहे. सुका-ओला कचरा वेगळा करून त्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र त्याला काही ठराविक सोसायट्या वगळता प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार असा प्रश्न पालिकेसमोर आहे. त्यामुळे येत्या १० वर्षांत कचरा मुक्त मुंबई करण्यासाठी पालिकेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा कचऱ्याची विकेंद्रीकरणाची पद्धत अवलंबली जाणार आहे.

त्यानुसार स्थानिक वॉर्ड पातळीवरच कचरा विलगीकरणाची आणि विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या ओला-सुका कचरा हा डंपिंग ग्राऊंडवर जाणार नाही. विकेंद्रीकरणाच्या पद्धतीनुसार स्थानिक पातळीवरच ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिक, कर्मचारी आणि अधिकारी यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर कचऱ्याची विल्हेवाट लावताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरच सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करणे यासारख्या गोष्टी अपेक्षित आहेत. यासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे मोठे उद्दिष्ट महापालिकेपुढे असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in