प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर विशेष चिन्ह आवश्यक; महानगरपालिकेचे मूर्तिकारांना आवाहन

उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) पासून मूर्ती तयार करण्यास मूर्तिकारांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी काही अटी व नियमांच्या अधीन असून, त्यांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

वसई : उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) पासून मूर्ती तयार करण्यास मूर्तिकारांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी काही अटी व नियमांच्या अधीन असून, त्यांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

नागपूर खंडपीठाने रिट याचिका क्र. ४१७२/२०१२ मध्ये दिनांक ११ सप्टेंबर २०१२ रोजी दिलेल्या निर्देशांनुसार, पीओपीपासून तयार झालेल्या मूर्तींच्या ओळखीकरिता मूर्तीच्या मागील बाजूस तेलरंगात (Oil Paint) लाल रंगाचे ठळक व सहज ओळखता येईल, असे चिन्ह लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे चिन्ह नसलेल्या पीओपी मूर्तींची विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in