Mumbai : आज दुपारपर्यंत CNG पुरवठा होणार सुरळीत; MGL ने केले जाहीर

मुंबईतील पंपांना होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा मंगळवार दुपारपर्यंत पुन्हा सुरळीत होईल, असे ‘महानगर गॅस लिमिटेड’ने सोमवारी जाहीर केले.
Mumbai : आज दुपारपर्यंत CNG पुरवठा होणार सुरळीत; MGL ने केले जाहीर
छायाचित्र : विजय गोहिल
Published on

मुंबई : मुंबईतील पंपांना होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा मंगळवार दुपारपर्यंत पुन्हा सुरळीत होईल, असे ‘महानगर गॅस लिमिटेड’ने सोमवारी जाहीर केले.

शहरातील ३८९ सीएनजी पंपांपैकी जवळपास ६० टक्के, म्हणजेच २२५ पंप सध्या कार्यरत आहेत. ‘सीजीएस वडाळा येथील गॅस पुरवठा थांबल्यामुळे आणि त्यानंतर एमजीएलच्या पाईपलाइन नेटवर्कवर परिणाम झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील काही सीएनजी पंप बंद आहेत, असे ‘एमजीएल’ने जाहीर केले.

वडाळा येथे पाईपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे पंपांना होणारा गॅस पुरवठा बाधित झाला असून त्याचा परिणाम ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि काही सार्वजनिक वाहतूक सेवांवर झाला आहे. ‘एमजीएल’ने सांगितले की, पाईपलाइन दुरुस्त झाल्यानंतर आणि सीजीएस वडाळा येथील पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर संपूर्ण नेटवर्कमधील गॅस पुरवठा सामान्य होईल. दुरुस्तीचे काम सुरू असून गॅस पुरवठा मंगळवारपर्यंत सुरळीत होण्याची अपेक्षा आहे,’ असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in