Mumbai : मे अखेरपर्यंत कोस्टल रोडवर दोन फ्लड गेट्स बसवणार; इंदूर येथे चाचणी झाली पूर्ण

कोस्टल रोडवर पावसाळ्यात जमा होणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १५ फ्लड गेट्स बसवण्यात आले आहेत. मात्र यापैकी दोन फ्लड गेट्सचा आराखडा चुकल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे नव्याने फ्लड गेट्स बसवण्यात येणार असून इंदूर येथे चाचणी करण्यात आली आहे. हे दोन्ही गेट मे अखेरपर्यंत बसवण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
Mumbai : मे अखेरपर्यंत कोस्टल रोडवर दोन फ्लड गेट्स बसवणार; इंदूर येथे चाचणी झाली पूर्ण
Mumbai : मे अखेरपर्यंत कोस्टल रोडवर दोन फ्लड गेट्स बसवणार; इंदूर येथे चाचणी झाली पूर्ण
Published on

मुंबई : कोस्टल रोडवर पावसाळ्यात जमा होणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १५ फ्लड गेट्स बसवण्यात आले आहेत. मात्र यापैकी दोन फ्लड गेट्सचा आराखडा चुकल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे नव्याने फ्लड गेट्स बसवण्यात येणार असून इंदूर येथे चाचणी करण्यात आली आहे. हे दोन्ही गेट मे अखेरपर्यंत बसवण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

पावसाळ्यात कोस्टल रोडवर पाणी जमा झाल्यास तातडीने उपसा करण्यासाठी मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-लिंक दरम्यान १५ फ्लड गेट् बसवण्यात आले आहेत. समुद्रात येणाऱ्या भरतीच्या वेळी पाणी रोखण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने ही यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, समुद्रकिनाऱ्यापासून ६५ मीटर अंतरावर हे दोन्ही फ्लड गेट्स असल्याने समुद्राच्या लाटांच्या धडकेत नुकसान झाले.

नैसर्गिक परिस्थितीमुळे पूर प्रतिबंधक गेटचे नुकसान

ही घटना नैसर्गिक परिस्थितीच्या परिणामामुळे घडली असून डिझाईन साहित्याची गुणवत्ता किंवा कामाच्या दर्जाबाबत कोणत्याही त्रुटी नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. आता नवीन गेटची चाचणी इंदोरमध्ये पूर्ण झाली असून २० मे पर्यंत प्रकल्प ठिकाणी येतील आणि मे अखेर पर्यंत बसवले जातील, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

logo
marathi.freepressjournal.in