कोस्टल रोडचा भुयारी मार्ग सुरू; मुंबईकरांचा प्रवास सुस्साट

मुंबईमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील जे. के. कपूर चौक येथून सुरू होणाऱ्या भुयारी मार्गाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोस्टल भुयारी मार्ग आता चारचाकी वाहने आणि प्रवासी बस यांच्यासाठी खुला करण्यात आल्याने आता मुंबईकरांचा प्रवास आणखी सुस्साट होणार आहे.
कोस्टल रोडचा भुयारी मार्ग सुरू; मुंबईकरांचा प्रवास सुस्साट
Published on

मुंबई : मुंबईमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील जे. के. कपूर चौक येथून सुरू होणाऱ्या भुयारी मार्गाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोस्टल भुयारी मार्ग आता चारचाकी वाहने आणि प्रवासी बस यांच्यासाठी खुला करण्यात आल्याने आता मुंबईकरांचा प्रवास आणखी सुस्साट होणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किमीचा कोस्टल रोड बांधला गेला आहे. त्यामुळे आता प्रभादेवीतून नरिमन पॉइंट तसेच वांद्रे वरळी सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहतूक सोप्पी झाली आहे. भुयारी मार्गात दुचाकी, तीनचाकी आणि अवजड वाहनांना प्रवेश असणार नाही.

कोस्टल रोडचा हा मार्ग मध्य रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील फायदेशीर असणार आहे. तसेच दादर, प्रभादेवी येथून नरिमन पॉईंटला जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. कोस्टल रोडच्या या भुयारी मार्गाने प्रवासी दादर, प्रभादेवी येथून थेट नरिमन पॉईंट अवघ्या कमी वेळात गाठू शकणार आहेत. हा मार्ग सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत खुला असेल. हा भुयारी मार्ग जे. के. कपूर चौक ते कोस्टल रोड, तसेच सागरी सेतूला जोडला गेला आहे. त्यामुळे खान अब्दुल गफ्फार खान मार्गावरुन सी लिंकला जाणारी वाहतूक कोंडी कमी होईल.

logo
marathi.freepressjournal.in