कोस्टल रोडवरील विहार क्षेत्र, भुयारी मार्ग जनतेसाठी खुले

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील (कोस्टल रोड) प्रशस्त विहार क्षेत्र तसेच चार पादचारी भुयारी मार्ग शुक्रवार सायंकाळपासून जनतेसाठी खुले झाले. यावेळी नागरिकांकडून ‘भारत माता मी जय’च्या घोषणा देण्यात आल्या.
कोस्टल रोडवरील विहार क्षेत्र, भुयारी मार्ग जनतेसाठी खुले
छायाचित्र : देवश्री भुजबळ
Published on

मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील (कोस्टल रोड) प्रशस्त विहार क्षेत्र तसेच चार पादचारी भुयारी मार्ग शुक्रवार सायंकाळपासून जनतेसाठी खुले झाले. यावेळी नागरिकांकडून ‘भारत माता मी जय’च्या घोषणा देण्यात आल्या.

अरबी समुद्राची निळाई, त्यातून उसळणाऱ्या चित्तथरारक लाटा, डोळ्याचे पारणे फेडणारे विहार क्षेत्र आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात कोस्टल रोडवरील महालक्ष्मी (पीयूपी) येथील भुयारी मार्ग क्रमांक ४ आणि वरळी (पीयूपी) भुयारी मार्ग क्रमांक ११ येथून विहार क्षेत्रावर शुक्रवारी सायंकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली.

छायाचित्र : विजय गोहिल
छायाचित्र : विजय गोहिल
छायाचित्र : देवश्री भुजबळ

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रशस्त विहार क्षेत्रावर आलेल्या नागरिकांना 'राष्ट्रध्वज तिरंगा'चे वितरण यावेळी करण्यात आले. नागरिकांनीही हाती राष्ट्रध्वज घेऊन उत्स्फूर्तपणे येथे रपेट मारली आणि स्वातंत्र्यदिनाचा आनंद लुटला.

logo
marathi.freepressjournal.in