कोस्टल रोड १६ तास सुरू राहणार; चाचणीनंतर वेळापत्रक होणार कायम

सध्या कोस्टल रोडवर १२ तास वाहतूक चालते. पण, कोस्टल रोडची कार्यक्षमता तपासण्यासाठी आता तो १६ तास सुरू ठेवण्याचा...
कोस्टल रोड १६ तास सुरू राहणार; चाचणीनंतर वेळापत्रक होणार कायम

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मार्गिका वाहतुकीसाठी लवकरच कार्यान्वित होणार आहे. ही मार्गिका वाहतुकीसाठी सकाळी ७ ते रात्रौ ११ वाजेपर्यंत १६ तास सुरू ठेवली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. यापूर्वीची कोस्टल रोडची मार्गिका सकाळी ८ ते रात्रौ ८ वाजेपर्यंत सुरू असते.

सध्या कोस्टल रोडवर १२ तास वाहतूक चालते. पण, कोस्टल रोडची कार्यक्षमता तपासण्यासाठी आता तो १६ तास सुरू ठेवण्याचा विचार मुंबई मनपा करीत आहे. या महिन्यात दुसरी मार्गिका थेट १६ तास सुरू राहील.

मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चाचणीच्या काळात आम्ही सीसीटीव्ही, वायूविजन यंत्रणा, स्पीड डिटेक्टर्सची पडताळणी करणार आहोत. चाचणीत या सर्व यंत्रणा कार्यक्षमतेने सुरू राहत असल्याचे दिसताच या मार्गावर १६ तास वाहतूक चालवली जाईल. त्यानंतर तो कालावधी कायमस्वरुपी केला जाईल.

अमरसन्स आणि हाजी अली या दोन मार्ग बदलांचा विस्तार केला जाईल. म्हणजेच ते सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहतील. हा मार्ग रजनी पटेल जंक्शन (लोटस जंक्शन), अमरसन्स गार्डनमध्ये प्रवेश आणि मरीन ड्राइव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट) येथून बाहेर पडतो. बिंदू माधव ठाकरे चौक (खान अब्दुल गफ्फार रोड) येथून वाहनांचा प्रवेश पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे. चाचणीच्या काळात आम्ही परिस्थितीची पाहणी करणार आहोत. वाहतूक सुरळीत होत असल्यास हाच कालावधी कायमस्वरुपी ठेवला जाईल. दोन्ही मार्गिका सुरू झाल्यानंतर वायूविजन यंत्रणेचे आव्हान पेलावे लागेल. एक बोगदा १६ तास व्यवस्थित काम करत असल्याचे आढळल्यास ती चांगली सुरुवात असेल, असे मनपाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न

वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही बीएमसीच्या विचारांशी सहमत आहोत. वाहतुकीचा वेग सुरळीत राहणे हाच मुख्य उद्देश आहे. वाहन बंद पडून किंवा आग लागून वाहतूक विस्कळीत होऊ नये. आणीबाणीच्या काळात वाहतूक विस्कळीत होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कोस्टल रोडवरील सरळ रस्त्यावर ८० किमी प्रति तास, बोगद्यात ६० किमी तर वळणावर ४० किमी प्रति तास हा वेग राहणार आहे. दुचाकी, सायकल, तीनचाकी, पादचारी आदींना येथे बंदी कायम राहील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in