Mumbai : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण; १४ हजार लुटले, तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

जुहूतून एका १८ वर्षांच्या प्रथम वर्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्याकडील १४ हजार २५० रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
Mumbai : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण; १४ हजार लुटले, तिघा सराईत गुन्हेगारांना अटक
Mumbai : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण; १४ हजार लुटले, तिघा सराईत गुन्हेगारांना अटक 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मेघा कुचिक

मुंबई : जुहूतून एका १८ वर्षांच्या प्रथम वर्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्याकडील १४ हजार २५० रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. चोरांनी चाकूचा धाक दाखवत त्याला १५ मिनिटे जुहू परिसरात फिरवले. या प्रकरणी जुहू पोलिसांनी अपहरणाची, खंडणीची आणि दरोड्याची नोंद करत आझाद मनियार (३४), दीपेश चव्हाण (२९) आणि मोंड्या देवेंद्र ऊर्फ किशन (३०) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांना अटक केली.

चाकूचा धाक दाखवला

साडेनऊच्या सुमाराला बहीण आणि तिच्या दोघा मैत्रिणींना विलेपार्लेमध्ये वसतीगृहात सोडल्यानंतर अगरवाल कॅबजवळ असताना तीन जण तिथे आले. त्यातील एकाने कॅब चालकाला कानाखाली मारले आणि प्रवासी कुठून आले होते व तिथे काय करत होते, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी अगरवालला कॅबमध्ये कोंबले. त्यातील एक जण वाहनात बसला आणि त्याने चालकाला जुहूच्या विशिष्ट मार्गाने गाडी नेण्यास सांगितले. दरम्यान, इतर दोन आरोपी दुचाकीवरून कॅबचा पाठलाग करत त्यांना गाठले.

ठार मारण्याची धमकी

जुहूच्या रुईया पार्कजवळ आझाद मनियारने अगरवालला चाकूचा धाक दाखवून ५ हजार एका यूपीआय खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले, तर दुचाकीवरून कॅबचा पाठलाग करणाऱ्या दुसऱ्या आरोपीने अगरवालला रोखून धरले. या दरम्यान मनियारने त्याच्या पॅन्टच्या खिशातून ५ हजार २५० रुपये काढून घेतले. आरोपींनी अगरवालला त्याच्या बहिणीशी संपर्क साधण्यास भाग पाडले आणि आणखी ४ हजार रुपये मागवून ते त्याच खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देऊन त्यांनी त्याला मिठीबाई कॉलेजजवळ सोडून दिले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in