Mumbai : पश्चिम उपनगरातील काँक्रीट रस्त्यांसाठी ७,६०० कोटींचा खर्च; २७६ किमीचे रस्ते होणार मजबूत

खड्डे मुक्त मुंबईतील रस्त्यांसाठी सिमेंट काँक्रीट रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. दोन हजार १९६ किलोमीटरचे रस्ते काँक्रीटचे बांधले जात आहेत. यापैकी ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर पश्चिम उपनगरातील २७६ किमीचे रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
पश्चिम उपनगरातील काँक्रीट रस्त्यांसाठी ७,६०० कोटींचा खर्च; २७६ किमीचे रस्ते होणार मजबूत
पश्चिम उपनगरातील काँक्रीट रस्त्यांसाठी ७,६०० कोटींचा खर्च; २७६ किमीचे रस्ते होणार मजबूत
Published on

मुंबई : खड्डे मुक्त मुंबईतील रस्त्यांसाठी सिमेंट काँक्रीट रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. दोन हजार १९६ किलोमीटरचे रस्ते काँक्रीटचे बांधले जात आहेत. यापैकी ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर पश्चिम उपनगरातील २७६ किमीचे रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पश्चिम उपनगरातील काँक्रीट रस्त्यांसाठी ७,६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. आता सुरू असलेली काँक्रीट रस्त्यांची कामे आणि नव्याने हाती घेण्यात येणारी सीसी रस्त्यांची कामे पुढील दोन वर्षांत पूर्ण होतील, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे बांधण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेने काँक्रीट रस्त्यांसाठी आतापर्यंत १३ हजार कोटींच्या निविदा काढल्या होत्या. आता मुंबईतील रस्ते काँक्रीटचे करण्याचे काम सुरू असून टप्‍पा १ आणि टप्‍पा २ अंतर्गत शहर आणि उपनगर भागात काँक्रीटीकरण कामे सुरू आहेत.

मुंबईत एकूण दोन हजार १९६ किमी लांबीचे रस्ते आहेत. यापैकी एक हजार २२० किमीची काम महापालिकेने टप्प्याटप्प्यात हाती घेतली आहेत. यापैकी सध्या टप्पा दोन अंतर्गत ७०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. पुढच्या वर्षी मे महिन्यापर्यंत शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरातील सुमारे ७०० किमीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण होईल. पश्चिम उपनगरातील काँक्रीट रस्ते करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पश्चिम उपनगरात २७६ किलोमीटर लांबीचे ९९५ रस्ते आहेत. काँक्रीटीकरणाच्या अंतिम टप्पा तीनमधील या कामासाठी ७६०० कोटी रुपये खर्च केले.

रस्त्यांसाठी ६२ कोटींचा खर्च

गोराई व बोरिवलीतील डीपी रोडची सुधारणा करण्यासाठी सीसी रोड बनवण्यात येणार आहे. १.६० किलोमीटर लांब रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून यासाठी ६२ कोटी ५० लाख ७४ हजार ८०६ रुपये खर्च करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in