स्टॉक एक्स्चेंजबाहेर अदानी समूहाविरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन; या कॉंग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अदानी समूहाविरोधात महाराष्ट्रातील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजबाहेर काँग्रेस नेत्यांचे आंदोलन, नेत्यांना केली अटक
स्टॉक एक्स्चेंजबाहेर अदानी समूहाविरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन; या कॉंग्रेस नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आज सकाळी मुंबई काँग्रेसने अदानी समूहाविरोधात नॅशनल स्टॉक एक्स्चेंजबाहेर जोरदार आंदोलन केले. यावेळी हे आंदोलन रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. आंदोलन करणाऱ्या सर्व काँग्रेस नेत्यांना तिथून हटवून ताब्यात घेण्यात आले. यामध्ये काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चांगले संबंध असून अनेक विदेशी दौऱ्यावर ते सोबत जातात. तसेच, गौतम अदानींवर आर्थिक घोटाळे आणि भष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले. त्यानंतर आज सकाळी मुंबईमध्ये काँग्रेसने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजबाहेर तीव्र आंदोलन केले. यावेळी अदानींनी जे भष्ट्राचार आणि घोटाळे केले, यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजने त्यांना मदत केली असल्याचे गंभीर आरोप यावेळी काँग्रेसने केले.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अदानींबद्दल केलेल्या विधानानंतर काँग्रेसने अदानी समूहाला घेराव घालत आहेत. मुंबईमध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईचादेखील काँग्रेसने जोरदार विरोध केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल करताना "अदानी मोदी भाई भाई", "नरेंद्र मोदी डरते हैं…पोलीस को आगे करता है" अशा घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी हे आंदोलन थांबण्याचा प्रयत्न केला, तर भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in