मुंबई काँग्रेसचा इमारत दुर्घटनाग्रस्तांना दिला आधार

कुर्ला पूर्व परिसरातील नाईकनगर सोसायटीतील चार मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली
मुंबई काँग्रेसचा इमारत दुर्घटनाग्रस्तांना दिला आधार

सोमवारी रात्री कुर्ला पूर्व येथील नाईक नगर सोसायटीतील चार इमारतींपैकी एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत १९ जण दगावले, तर १० जखमी झाले. कुटुंबियांची विचारपूस व जखमींना आधार देण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भेट घेतली.

रिपरिप पावसाची मुंबईत आता कुठे सुरु झाली असतानाच परवा सोमवारी रात्री मध्यरात्री नेहरूनगर, कुर्ला पूर्व परिसरातील नाईकनगर सोसायटीतील चार मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या आवाजासह या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एका क्षणात अनेकांचे संसार गाडले गेले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी काल सायंकाळी नाईकनगर इमारत दुर्घटनास्थळी धाव घेतली व जखमीं दुर्घटनाग्रस्त नागरिकांची चौकशी केली व दुर्घटनेने हादरलेल्या स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, त्यांचे सांत्वन केले व त्यांना दिलासा दिला. तसेच यावेळेस भाई जगताप यांनी उपस्थित महानगरपालिका अधिकारी, अग्निशमन दल, पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेतली व होत प्रशासनाकडून होत असलेल्या मदत कार्याची व बचावकार्याची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in