मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा खोटा व्हिडीओ काँग्रेसने प्रसारित केल्याचा आरोप करत गुरुवारी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी मुंबईतील किल्ला कोर्ट परिसरात असलेल्या काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला. भाजप युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात सोनिया गांधींसह राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड या काँग्रेस नेत्यांच्या फोटोंवर शाईफेक केली. तसेच पेव्हर ब्लॉकने काँग्रेस कार्यालयाच्या काचा फोडल्या. पोलिसांनी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्जही केला. पोलिसांनी याप्रकरणी १२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अपमान केल्याचा दावा करत भाजयुमोचे कार्यकर्ते गुरुवारी दुपारी अचानक मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात शिरले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाच्या काचेच्या खिडक्या दगडाने फोडल्या, मोठे दगड कार्यालयावर भिरकावण्यात आले. खुर्च्यादेखील तोडण्यात आल्या.