Mumbai : कोटीच्या कोटी उड्डाणे; नगरसेवकांवर वाढीव निधीचा वर्षाव, गणेश खणकर यांना सर्वाधिक १५ कोटींचा निधी

मुंबई महापालिकेच्या सर्वपक्षीय गटनेते व नगरसेवकांना वाढीव निधी उपलब्ध करताना कोटीच्या कोटी उड्डाणे घडली आहेत.
Mumbai : कोटीच्या कोटी उड्डाणे; नगरसेवकांवर वाढीव निधीचा वर्षाव, गणेश खणकर यांना सर्वाधिक १५ कोटींचा निधी
Mumbai : कोटीच्या कोटी उड्डाणे; नगरसेवकांवर वाढीव निधीचा वर्षाव, गणेश खणकर यांना सर्वाधिक १५ कोटींचा निधीसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सर्वपक्षीय गटनेते व नगरसेवकांना वाढीव निधी उपलब्ध करताना कोटीच्या कोटी उड्डाणे घडली आहेत. प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी यात भाजपचे पालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर यांना १५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर मनसे, ठाकरे सेना असा राजकीय प्रवास करत भाजपमध्ये आलेल्या अर्चना भालेराव यांना १० कोटींचा वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या राखी जाधव यांना सात कोटी रुपये अधिक निधी मिळणार आहे.

२७ च्या अर्थसंकल्पावर १८८ मुंबई महापालिकेच्या सन २०२६ नगरसेवकांनी ९४ तास चर्चा केली. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वपक्षीय गटनेते व नगरसेवकांनी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा, यावर चर्चेदरम्यान भर दिला. अर्थसंकल्पात स्थायी समितीसाठी ८०० कोटींचा वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात आला, तर स्थायी समितीच्या विकास निधीतून विरोधी पक्षाच्या

नगरसेवकांची २५ लाखांवर बोळवण केली होती. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना २ कोटी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तसेच भाजप महायुतीतील प्रभाग समिती अध्यक्षांना अतिरिक्त जादा निधी उपलब्ध केल्याने सत्ताधारी पक्षावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. अखेर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी अंधेरीतील नगरसेवकांच्या निधीत कपात करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्षांना पत्र लिहून केली होती. अमित साटम यांच्या पत्राची दखल घेत अंधेरीतील सहा प्रभागातील नगरसेवकांच्या निधीत कपात करण्यात आली. मात्र अर्थसंकल्पीय चर्चेत नगरसेवकांनी वाढीव निधी मिळावा ही मागणी केली आणि आता त्यांना वाढीव निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

प्रभागनिहाय वाढीव निधी उपलब्ध

नगरसेवक प्रभाग आधीचा निधी आणि वाढीव निधी

  • रेखा यादव - आर/उत्तर - २.५० लाख आधी आता १ कोटींची वाढ

  • तेजस्वी घोसाळकर - आर/उत्तर - २.५० लाख २ कोटी वाढीव निधी

  • प्रकाश दरेकर - आर/उत्तर - ५ कोटी २ कोटींची वाढ

  • मंगेश पांगारे - आर/उत्तर - २.५० लाख १ कोटी वाढ

  • संजय घाडी - आर/उत्तर - १० कोटी वाढीव २ कोटी

  • दीक्षा कारकर - आर/उत्तर - ३ कोटी वाढीव २ कोटी

  • योगिता पाटील - आर/उत्तर - २.५० लाख २ कोटी वाढीव निधी

  • शिवानंद शेट्टी - आर/मध्य - २.५० लाख २ कोटी वाढीव निधी

  • जितेंद्र पटेल - आर/मध्य - २.५० लाख २ कोटी वाढीव निधी

  • डॉ. अदिती खमसंगे - आर/मध्य - २.५० लाख १ कोटी वाढीव निधी

विविध पक्षांना मिळालेला अधिक निधी

एकनाथ शिंदे शिवसेना

  • गटनेते अमय घोले- आधी १० कोटी, वाढीव १ कोटी

  • संध्या दोशी आधी १० कोटी, आता १ कोटी ९० लाख वाढीव

भाजप

  • गणेश खणकर आता १५ कोटी वाढीव निधी

  • रोहन राठोड आधी ९ कोटी, वाढीव २ कोटी

  • हेतल गाला आधी ३ कोटी, वाढीव १ कोटी

  • नील सोमय्या आधी २.५० कोटी, वाढीव २ कोटी

  • अर्चना भालेराव आधी २.५० कोटी, वाढीव १० कोटी

  • राखी जाधव आधी ३ कोटी, वाढीव १० कोटी

मनसे

  • यशवंत किल्लेदार आधी २ कोटी, वाढीव १ कोटी

ठाकरे सेना

  • किशोरी पेडणेकर आधी २ कोटी, वाढीव १ कोटी

logo
marathi.freepressjournal.in