Mumbai: हत्येच्या आरोपातून वृद्धाची निर्दोष सुटका; ४८ वर्षांनी सत्र न्यायालयाचा निकाल

हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात ८१ वर्षीय वृद्धाला मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. जामीनावर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर वृद्ध आरोपी तब्बल ४८ वर्षे फरार होता. अखेर यंदा ऑक्टोबरमध्ये मुंबई पोलिसांनी वृद्ध आरोपी चंद्रकांत कालेकर यांना अटक केली होती.
 हत्येच्या आरोपातून वृद्धाची निर्दोष सुटका; ४८ वर्षांनी सत्र न्यायालयाचा निकाल
हत्येच्या आरोपातून वृद्धाची निर्दोष सुटका; ४८ वर्षांनी सत्र न्यायालयाचा निकाल(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात ८१ वर्षीय वृद्धाला मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. जामीनावर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर वृद्ध आरोपी तब्बल ४८ वर्षे फरार होता. अखेर यंदा ऑक्टोबरमध्ये मुंबई पोलिसांनी वृद्ध आरोपी चंद्रकांत कालेकर यांना अटक केली होती. मात्र दोन महिन्यांतच न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी कालेकर यांच्या निर्दोष सुटकेचा आदेश दिला.

कुलाबा पोलिसांनी १९७७ मध्ये चंद्रकांत कालेकर यांना त्यांच्या तत्कालीन प्रेयसीवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी आरोपी बनवले होते. त्यावेळी कालेकर यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र जामीनावर बाहेर असतानाच ते फरार झाले होते. त्यानंतर १९८४ मध्ये त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर हा खटला निष्क्रिय झाला होता. अखेर ऑक्टोबरमध्ये मतदार यादी आणि इतर कागदपत्रांवरून तसेच गुप्तचर माहितीच्या आधारे कालेकर यांचा रेकॉर्ड सापडल्यानंतर पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावात कालेकर यांचा शोध घेतला होता. त्यांना तेथून अटक केल्यानंतर सत्र न्यायालयात दोन महिने खटला चालला.

logo
marathi.freepressjournal.in