Mumbai : पत्नीचे उत्पन्न पोटगीच्या हक्काच्या आड येऊ शकत नाही; दंडाधिकारी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पत्नीला तिचा रंग, केस आणि ड्रेसच्या आवडीनिवडीवरून टोमणे मारणाऱ्या पतीला गिरगावच्या दंडाधिकारी न्यायालयाने चांगलाच झटका दिला. पत्नीचे उत्पन्न पोटगीच्या हक्काच्या आड येऊ शकत नाही, पोटगी हा स्वतंत्र हक्क आहे.
Mumbai : पत्नीचे उत्पन्न पोटगीच्या हक्काच्या आड येऊ शकत नाही; दंडाधिकारी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Mumbai : पत्नीचे उत्पन्न पोटगीच्या हक्काच्या आड येऊ शकत नाही; दंडाधिकारी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णयप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : पत्नीला तिचा रंग, केस आणि ड्रेसच्या आवडीनिवडीवरून टोमणे मारणाऱ्या पतीला गिरगावच्या दंडाधिकारी न्यायालयाने चांगलाच झटका दिला. पत्नीचे उत्पन्न पोटगीच्या हक्काच्या आड येऊ शकत नाही, पोटगी हा स्वतंत्र हक्क आहे. त्याचा वैवाहिक आरोपांपासून अलिप्तपणे विचार केलाच पाहिजे, असे महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवत दंडाधिकारी न्यायालयाने अर्जदार महिलेला पतीकडून दरमहा २५ हजार रुपयांची पोटगी मंजूर केली.

पतीसह सासरच्या इतर मंडळींवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करीत महिलेने पोटगीसाठी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. पतीकडून दरमहा ६० हजार रुपयांच्या पोटगीची मागणी तिने केली होती. तिच्या अर्जावर गिरगाव येथील न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांनी निर्णय देताना पोटगीची विनंती अंशतः मान्य केली. पतीने अर्जदार महिलेला दरमहा २५ हजार रुपयांची पोटगी द्यावी, असे निर्देश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले.

या प्रकरणात अर्जदार महिलेचा कौटुंबिक छळ होत असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

दाम्पत्याचे लग्न ४ डिसेंबर २०१६ मध्ये झाले होते. मात्र सासरच्यांकडून वारंवार त्रास दिला गेल्यानंतर महिला २० ऑगस्ट २०२२ रोजी पतीपासून अलिप्त झाली होती. महिलेला हुंड्यासाठी छळण्याबरोबर वारंवार रंग, केस आणि तिच्या ड्रेसच्या निवडीवरून टोमणे मारले जात होते. हा कौटुंबिक छळ असल्याचा दावा महिलेने केला आणि पोटगीसाठी न्यायालयाचे दार ठोठावले होते.

logo
marathi.freepressjournal.in