मुंबई क्रिकेट असोसिएशन देणार ग्राउंड्समनला बोनस

४८ ग्राउंड्समेनला प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस मिळण्याचा प्रस्ताव आहे
मुंबई क्रिकेट असोसिएशन देणार ग्राउंड्समनला बोनस

आयपीएलच्या काळात एमसीएच्या ग्राउंड्समननी सराव आणि प्रत्यक्ष सामन्यांच्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी दिवस-रात्र काम केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केल्यांनतर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनदेखील (एमसीए) आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आयपीएल दरम्यान केलेल्या कामगिरीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीए) ४८ ग्राउंड्समेनला प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस मिळण्याचा प्रस्ताव आहे.

यावर्षी २६ मार्च ते २९ जून या कालावधीमध्ये झोलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५ वा हंगामात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम, वानखेडे स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियमचा समावेश या चार ठिकाणी एकूण ७० सामने खेळविण्यात आले होते. या ठिकाणच्या सर्व सामन्यांचे प्रत्यक्ष नियोजन करण्यात तेथील ग्राऊंड स्टाफने बीसीसीआयला मोलाची साथ दिली होती.

एमसीएतर्फे ४८ ग्राउंड्समेनला प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याच्या प्रस्तावाला एमसीएच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. एमसीएने स्पष्ट केले की, आयपीएलच्या काळात एमसीएच्या ग्राउंड्समननी सराव आणि प्रत्यक्ष सामन्यांच्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी अहोरात्र काम केले. एप्रिल-मेच्या कडाक्याच्या उन्हात दररोज सामने खेळले जात असतानाही खेळपट्ट्यांबद्दल एकही तक्रार आली नव्हती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in