पत्नीला अश्लील मेसेज का पाठविला?, पत्नीच्या मित्राला जाब विचारणे पतीला महागात पडले

२१ वर्षांची तक्रारदार महिला ही भांडुप येथे राहत असून, निलेश हा तिचा पती आहे. एप्रिल २०२१ रोजी या दोघांचे लग्न झाले होते.
पत्नीला अश्लील मेसेज का पाठविला?, पत्नीच्या मित्राला जाब विचारणे पतीला महागात पडले
Published on

मुंबई : पत्नीला अश्लील मेसेज का पाठविला असा जाब विचारला म्हणून पतीवर पत्नीच्या मित्राने घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भांडुप परिसरात घडली. या हल्ल्यात निलेश शामराव बावस्कर हा जखमी झाला असून त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी वैभव कांबळे या आरोपी मित्राविरुद्ध कांजूरमार्ग पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

२१ वर्षांची तक्रारदार महिला ही भांडुप येथे राहत असून, निलेश हा तिचा पती आहे. एप्रिल २०२१ रोजी या दोघांचे लग्न झाले होते. लग्नापूर्वी ती कल्याण येथे राहत होती. तिथेच वैभव हा राहत होता. त्यामुळे त्यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावरून त्याने तिला फ्रेंण्ड रिक्वेस्ट पाठविली होती. गुरुवारी वैभवने तिला एक अश्लील मेसेज पाठविला होता. त्यामुळे त्याने वैभवला भांडुप येथे बोलाविले होते. तिथे भेटल्यांनतर त्याने तिला अशा प्रकारे अश्‍लील मॅसेज का पाठविला याबाबत जाब विचारला होता. त्याचा राग आल्याने वैभवने निलेशच्या छातीवर कुठल्या तरी घातक शस्त्रांनी भोसकले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in