Mumbai Crime : मुंबईतील सायन भागात उपद्रवी तरुणांचा पोलिसांवर हल्ला ; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हायरल व्हिडिओ काही उपद्रवी तरुण दोन पोलिसांना शिवीगाळ तसंच मारहाण करताना दिसून येत आहे
Mumbai Crime : मुंबईतील सायन भागात उपद्रवी तरुणांचा पोलिसांवर हल्ला ; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबईतील सायन परिसरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात काही उपद्रवी तरुण मंडळी दोन पोलिसांना मारहाण करताना दिसून येत आहे. हे तरुण पोलिसांना ऑन ड्यूटी शिवीगाळ करत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्याद कैद झाला आहे. तरुण आणि पोलीस यांच्यातील वाद सुरु असताना कोणीही यात मध्यस्थी करताना दिसत नाही.

तरुणांकडून पोलिसांना मारहाण होत असताना कोणीही यात हस्तक्षेप करत नाही. स्थानिक यात फक्त बघण्याची भूमिका पार पाडत आहेत. तर काही लोक तरुणांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे तरुण वाद घालत असताना पोलिसांनी वर्दीचा फायदा घेत असल्याच बोलत आहेत.

या संपूर्ण भांडणात एक विद्यार्थी हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री उशिरा ही घटना घडली. हा व्हिडिओ सोशल मीडियीवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समाजवादी पक्षाने नेते अबू आझणी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यानंतर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असताना अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या घटनेबाबतचा पुढील तपास सुरु केला आहे. लवकरच यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in