Mumbai Crime : वांद्रे टर्मिनसवर तरुणाचा खून ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

सध्या मुंबईत गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दररोज कुठं ना कुठं हत्येची, चोरीची, विनयभंगाची किंवा बलात्काराची बातमी समोर येतं आहे.
Mumbai Crime : वांद्रे टर्मिनसवर तरुणाचा खून ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून देशाची आर्थिक राजधानी असं देखील या शहराला संबोधलं जातं. देशभरातून लोक आपले स्वप्न घेऊन या शहरात येत असतात. सर्वांना आपल्या सामाहून घेण्याची क्षमता या शहरात आहे. मात्र सध्या मुंबईत गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दररोज कुठं ना कुठं हत्येची, चोरीची, विनयभंगाची किंवा बलात्काराची बातमी समोर येतं आहे.

अशातच आता अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे टर्मिनस परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे वांद्रे परिसरात खळबळ उडाली आहे. विक्रम सिंग(३५) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. मृत तरुण मूळचा राजस्थानचा असून तो सध्या मुंबईतील खार परिसरात वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्येप्रकरणी वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी ताबोडतोब तपास सुरु केला असून त्यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या खुनाचा अधिक शोध घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in