Mumbai CSMT: सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाला आजपासून सुरुवात; 2 हजार 400 कोटी खर्चून होणार कायापालट

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Mumbai CSMT: सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाला आजपासून सुरुवात; 2 हजार 400 कोटी खर्चून होणार कायापालट

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(CSMT) स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. प्रवाशांसाठी आता अत्याधुनिक सुविधा करण्यात येणार आहेत. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून त्यासाठी २ हजार ४०० कोटी खर्च केले जाणार आहेत. सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास करत असताना हेरिटेज इमारतींना धक्का लागू देणार नाही, असं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. सीएसएमटी बरोबर देशातील १ हजार २५० रेल्वे स्थानकांचाही टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारे हे पुनर्विकासाचे काम केले जाणार आहे. प्रस्तावित नवे डीआरएम कार्यालयाच्या पायाच खण्याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेअंती अहलुवालिया यांची निवड झाली असून यासाठी २,४५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी साधारणपणे चार वर्षांची कालमर्यादा आहे.

सीएसएमटी स्थानकावर चार मजल्यांचं नवं डीआरएण कार्यालय उभारण्यात आलंय. दरम्यान दुमजली प्रवासी विश्रामगृह देखील असणार आहे. प्रवासी संबंधित वस्तूंच्या विक्रीसाठी इमारती, पार्सल इमारती असणार आहेत. मेल-एक्स्प्रेस आणि लोकलला जोडणारा डेक निर्माण केला जाईल. अद्यायावत पादचारी पूल, स्कायवॉक उभारणी करण्यात येईल. वारसा इमारतीच्या पिरसरात मोकळ्या जागेची निर्मिती केली जाईल. संपूर्ण छताचं नुतनीकरण, रेल्वे स्थानकांलगत संरक्षक भिंत देखील उभारण्यात येणार आहे.

आतापर्यंत सीएसएमटी ड्रोन-रडार-हवाई सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. तसंच स्थलांतरित करण्यात येणारी जागेची तपासणी देखील करण्यात आली आहे. स्थलांतरित करणाऱ्या अॅनेक्स इमारत, पार्सल इमारत, ट्रॅफिक इमारत यांच्या तपशिलाचं संकलन पूर्ण झालं. फलाट क्रमांक १८वर कार्यलय देखील तयार झाले आहे.

या प्रकल्पाचा पूर्ण आराखडा तयार करण्याचं काम सध्या सुरु आहरे. याच बरोबर पुनर्विकास जागेभोवती बॅरिकेडिंगचे काम हे २१ टक्के पूर्ण झालं. नव्या डीआरएम कार्यालयाचा पाया खणण्याचं काम ७५ टक्के पूर्ण झालं आहे. फलाट क्रमांक १८ जवळ तात्पुरते पार्सल कार्यलय बांधकाम सध्या सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in