Mumbai : कफ परेड मरिना प्रकल्पाला स्थगिती; MMRDA च्या मंजुरीची एमसीझेडएमएची मागणी

कफ परेड येथे प्रस्तावित असलेल्या मरिना प्रकल्पाला नवीन अडथळा निर्माण झाला आहे.
Mumbai : कफ परेड मरिना प्रकल्पाला स्थगिती; MMRDA च्या मंजुरीची एमसीझेडएमएची मागणी
Mumbai : कफ परेड मरिना प्रकल्पाला स्थगिती; MMRDA च्या मंजुरीची एमसीझेडएमएची मागणी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

स्वीटी भागवत

मुंबई : कफ परेड येथे प्रस्तावित असलेल्या मरिना प्रकल्पाला नवीन अडथळा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए), हा प्रस्तावित मरिना प्रकल्प आणि एमएमआरडीएचा नरिमन पॉइंट-कुलाबा/कफ परेड पूल प्रकल्प एकमेकांच्या वर किंवा जवळ येतात का, याबाबत स्पष्टीकरण किंवा एनओसी मागितली असून त्यामुळे प्रकल्पावरील निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे.

एमसीझेडएमएच्या २४ सप्टेंबरला झालेल्या २०२ व्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या बैठकीत रश्मी डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडने कफ परेड येथे अंतर्गत जलवाहतूक टर्मिनल आणि मरिना विकसित करण्यासाठी सादर केलेल्या नवीन सीआरझेड मंजुरी अर्जावर विचार करण्यात आला. तज्ज्ञ सदस्यांनी असे निदर्शनास आणले की, एमएमआरडीएने त्याच किंवा लगतच्या भागात नरिमन पॉइंटला कुलाबा/कफ परेडशी जोडणाऱ्या पुलाचा प्रस्ताव ठेवला आहे. या पूल प्रस्तावाला ६ ऑगस्ट रोजी एमसीझेडएमएने केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे शिफारस केली असून तो सध्या मंत्रालयाच्या विचारधीन आहे. दोन्ही प्रकल्प एकमेकांत अडथळा ठरणार नाहीत किंवा ओव्हरलॅप होणार नाहीत, याची पुष्टी करणारे स्पष्टीकरण किंवा एनओसी एमएमआरडीएडून घ्यावी, असे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.

सुधारित तपशील, नव्या अर्जाची आवश्यकता

विकासकाने प्रकल्पाच्या तांत्रिक तपशिलांमध्ये आणि घटकांमध्ये सुधारणा करण्याची परवानगी मागितल्यानंतर मागील प्रस्ताव मागे घेण्यात आला होता, त्यानंतर हा नवीन अर्ज करण्यात आला आहे. या आधीचा अर्ज जुलैमध्ये केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे शिफारशीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, रश्मी डेव्हलपमेंटने २५ ऑगस्ट रोजी तो मागे घेण्याची विनंती केली, कारण प्रकल्पातील बदलांसाठी सुधारित तपशील आणि नव्या अर्जाची आवश्यकता होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in