
मुंबई : मुंबईचे डबेवाले त्यांची नियमित टिफिन सेवा ७ जुलै २०२५ रोजी - सोमवारच्या दिवशी तात्पुरती स्थगित करणार आहेत. या दिवशी ते वार्षिक आषाढी एकादशी वारीमध्ये सहभागी होणार आहे. त्यांच्यासाठी हा आध्यात्मिकदृष्ट्या मानला जातो. सोहळा महत्त्वाचा मुंबई डबेवाला असोसिएशनने जाहीर केले की, त्यांच्या अनेक सदस्यांनी पंढरपूर वारीसाठी प्रयाण केले असल्याने ७ जुलै रोजी डबे पोहोचवण्याची सेवा बंद राहील.
वारी ही महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांची श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती यांचे प्रतीक असून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या घेऊन भक्तगण अनेक दिवस चालत पंढरपूरकडे जातात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हा सोहळा पार पडतो.
मुंबई डबेवाले याला एक सामूहिक श्रद्धायात्रा मानतात. ही केवळ धार्मिक परंपरा नसून संस्कृतीची आठवण करून देणारा आत्मिक प्रवास असल्याचे असोसिएशनने सांगितले.