Mumbai : दादर रेल्वे पोलीस वसाहतीच्या विकासासाठी शासनाचा पुढाकार

मुंबईतील प्रत्येक रेल्वे पोलीस बांधवाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून, निधीच्या पूर्ततेनुसार टप्प्याटप्प्याने या घरांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
Mumbai : दादर रेल्वे पोलीस वसाहतीच्या विकासासाठी शासनाचा पुढाकार
Published on

मुंबई : मुंबईतील प्रत्येक रेल्वे पोलीस बांधवाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून, निधीच्या पूर्ततेनुसार टप्प्याटप्प्याने या घरांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

कदम यांनी गुरुवारी दादर (पूर्व) येथील रेल्वे पोलीस वसाहतीला भेट देऊन तेथील पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान त्यांनी वसाहतीतील जागेची पाहणी केली आणि पायाभूत सुविधांची माहिती घेतली. या प्रसंगी माजी नगरसेवक अमेय घोले, संबंधित पोलीस अधिकारी आणि पोलीस कुटुंबीय उपस्थित होते.

साडेतीन एकरांवर पसरलेल्या या वसाहतीत सध्या सुमारे २८० पोलीस कुटुंबीय राहतात. या जागेवर उंच मजली इमारती उभारल्यास हजाराहून अधिक कुटुंबांना निवासाची सुविधा मिळू शकते. त्यामुळे मुंबईतील रेल्वे पोलिसांचा निवासाचा मोठा प्रश्न सुटू शकतो, असे कदम यांनी सांगितले.

शासन स्तरावर या संदर्भात सकारात्मक पावले उचलली जात असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी पोलीस कुटुंबीयांना दिले. “पोलीस गृहनिर्माण संस्थांमार्फत मागील काही वर्षांत राज्यभरात गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात आले असून, त्यात गतिमानता आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.”

logo
marathi.freepressjournal.in