Mumbai : ट्रॅफिकपासून दिलासा मिळणार; टिळक पुलावरील वाहतूककोंडी संपणार

एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने दादर येथील टिळक उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून...
Mumbai : ट्रॅफिकपासून दिलासा मिळणार; टिळक पुलावरील वाहतूककोंडी संपणार
Published on

मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने दादर येथील टिळक उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून महापालिका जी. उत्तर विभाग कार्यालयासमोरील रस्ता आता थेट सेनापती बापट मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे शिवाजी मंदिर आणि वीर कोतवाल येथे होणारी वाहतूककोंडी भविष्यात संपुष्टात येणार आहे.

दादर पश्चिम येथील एन. सी. केळकर मार्गाला जोडून जे. के. सावंत मार्ग जात आहे. हा मार्ग पुढे मनमाला टँक रोडला जोडला जाऊन पुढे माटुंगा रोड पश्चिम येथील पुलाजवळ जोडला आहे. या जे. के. सावंत मार्गावर महापालिका जी उत्तर विभागासमोरून हरिश्चंद्र येलवे मार्ग जात आहे. हा येलवे मार्ग पुढे जावून खंडित होत असून या रस्त्याचा पुढील मार्ग मोकळा केल्यास तो सेनापती बापट मार्गाला जाऊ मिळू शकतो. त्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाने निर्णय घेत जमीन संपादित करून येवले मार्ग सेनापती बापट मार्गाला जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा रस्ता जे. के. सावंत मार्गाच्या ठिकाणी ४० फूट रुंदीचा आणि पुढे ५० फूट रुंदीचा तर सेनापती बापट मार्गाला जोडण्याच्या ठिकाणी ६.१० मीटर अर्थात २० मीटर रुंदीचा असेल.

महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आता जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसेच रस्ता रूंदीकरणासाठीचा अडथळा दूर करून छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृहासमोरील जे. के. सावंत मार्गाला जोडणारा हरिश्चंद्र येलवेमार्ग थेट सेनापती बापट मार्गाला जोडला जाणार आहे. तर हरिश्चंद्र येलवे मार्ग हा जे. के. सावंत मार्गापासून सेनापती बापट मार्गाला जोडल्यास न. चि. केळकर मार्गावरील कोतवाल उद्यान व टिळक पुलावरील वाहतूककोंडी कमी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in