धरणक्षेत्रात १३ टक्के पाणीसाठा; २४ तासांत पाणीसाठ्यात ३.७८ टक्क्यांनी वाढ

पालघर, ठाणे, मुंबईसह परिसराला झोडपून काढणाऱ्या पावसाने आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्राकडे मोर्चा वळवला आहे. धरण क्षेत्रात पावसामुळे बरसणाऱ्या पाणीसाठ्यात गेल्या २४ तासांत ३.७८ टक्क्यांनी वाढ झाली असून सातही धरणांतील पाणीसाठा ५ जुलै रोजी १३.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
संग्रहित छायाचित्रv
संग्रहित छायाचित्रv
Published on

मुंबई: पालघर, ठाणे, मुंबईसह परिसराला झोडपून काढणाऱ्या पावसाने आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्राकडे मोर्चा वळवला आहे. धरण क्षेत्रात पावसामुळे बरसणाऱ्या पाणीसाठ्यात गेल्या २४ तासांत ३.७८ टक्क्यांनी वाढ झाली असून सातही धरणांतील पाणीसाठा ५ जुलै रोजी १३.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणक्षेत्रात वरुणराजाने दमदार एंट्री केल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

तहान भागवणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाने बॅटिंगला सुरुवात केली आहे.

मुंबई व परिसरात गेल्या सात दिवसांपासून मुंबई व परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे. जून महिन्यात उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वरुणराजाने 'थंडा थंडा कुल कुल' केले आहे. मुंबई व परिसरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकर सुखावला असून आता मुंबईकरांची

मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत ५ जुलै रोजी १ लाख ९० हजार ८९८

दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू राहिली तर पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होईल आणि मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धरणक्षेत्रातही पाण्याची भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी बहुतांशी धरणे ही ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

५ जुलै रोजी पाणीसाठा (टक्केवारीत)

  • अप्पर वैतरणा - ४.३१

  • मोडकसागर - २६.८२

  • तानसा - ११.०७

  • मध्य वैतरणा - १६.४७

  • भातसा - ९.९३

  • विहार - ७९.८५

  • तुळशी - ६५.३७

धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)

  • अप्पर वैतरणा - ५९.०० मिमी

  • मोडकसागर - ८२.०० मिमी

  • तानसा - ९२ मिमी

  • मध्य वैतरणा - ८६ मिमी

  • भातसा - ८७.०० मिमी

  • विहार - २७५.०० मिमी

  • तुळशी - ३२१ मिमी

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in