Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी! पाणीसाठा ८३.६८ टक्क्यांवर; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी १६ टक्क्यांची गरज

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरु आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे गेल्या २४ तासांत धरणातील पाणीसाठ्यात ६.०६ टक्के वाढ झाली आहे.
Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी! पाणीसाठा ८३.६८ टक्क्यांवर; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी १६ टक्क्यांची गरज
Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी! पाणीसाठा ८३.६८ टक्क्यांवर; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी १६ टक्क्यांची गरजप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरु आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे गेल्या २४ तासांत धरणातील पाणीसाठ्यात ६.०६ टक्के वाढ झाली आहे. २५ जुलै रोजी सातही धरणातील पाणीसाठा १२ लाख ११ हजार १८८ दशलक्ष लिटर अर्थात ८३.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे १०० टक्के धरण भरण्यासाठी आणखी १६ टक्के पाणीसाठ्यात वाढ होण्याची गरज आहे.

मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणात २५ जुलै रोजी १२ लाख ११ हजार १८८ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु राहिली तर पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)

  • अप्पर वैतरणा - १३१.०० मिमी

  • मोडक सागर - ८४.०० मिमी

  • तानसा - ९०.०० मिमी

  • मध्य वैतरणा - ९३.०० मिमी

  • भातसा - १५९.०० मिमी

  • विहार - १३.०० मिमी

  • तुळशी - १७.०० मिमी

३ वर्षांतील साठा (दशलक्ष लिटर)

  • २०२६ - १२,११,१८८

  • २०२५ - १२, ६२,९८९

  • २०२४ - ९,६६,३९५

२५ जुलै रोजी पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)

  • अप्पर वैतरणा - १,५४,६३४

  • मोडक सागर - १,२८,९२५

  • तानसा - १,४२,८२८

  • मध्य वैतरणा - १,५६,२३२

  • भातसा - ५,९२,८२४

  • विहार - २७,६९८

  • तुळशी- ८,०४६

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in