Mumbai : मांस महागणार; देवनार कत्तलखान्यातील शुल्कात होणार वाढ

देवनार कत्तलखान्यातील कत्तल शुल्कात वाढ करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावामुळे मुंबईकरांना मांसासाठी प्रति किलो ६० ते ७० रुपये अधिक मोजावे लागतील, असे संकेत स्थायी समितीतील प्रस्तावावरुन मिळत आहेत.
Mumbai : मांस महागणार; देवनार कत्तलखान्यातील शुल्कात होणार वाढ
Mumbai : मांस महागणार; देवनार कत्तलखान्यातील शुल्कात होणार वाढप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : देवनार कत्तलखान्यातील कत्तल शुल्कात वाढ करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावामुळे मुंबईकरांना मांसासाठी प्रति किलो ६० ते ७० रुपये अधिक मोजावे लागतील, असे संकेत स्थायी समितीतील प्रस्तावावरुन मिळत आहेत. शुल्कवाढीचा फटका ग्राहकांना बसणार असल्याने प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने कत्तलखान्याच्या शुल्कसूचीच्या भाग-दोनमध्ये सुधारणा सुचवली आहे. शुल्कसूची १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या ठरावानुसार मंजूर करण्यात आली. मनुष्यबळाचा खर्च, वस्तूंच्या वाढलेल्या किमती, जुनी झालेली यंत्रे, उपकरण देखभालीमुळे कत्तलखान्याचा खर्च वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

म्हशीच्या कत्तल शुल्कात ३३५ रुपयांवरून ५४५ रुपये, शेळ्या-मेंढ्यांच्या शुल्कात १०५ रुपयांवरून २१५ रुपये, वराहाच्या शुल्कात २५८ रुपयांवरून ३४८ रुपये वाढ प्रस्तावित आहे. म्हशीच्या शुल्कात ६२ टक्के, शेळ्या-मेंढ्यांच्या शुल्कात १०० टक्क्यांहून अधिक वाढ होत असल्याने या प्रस्तावाचे स्थायी समितीत पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in