धारावी खड्डेमुक्त होणार; पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती, BMC २ कोटी ७५ लाख ४० हजार रुपये खर्च करणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर येथील रस्त्यांची पुनर्बाधणी नवीन आराखड्यानुसार होणार आहे. धारावीतील रस्ते खड्डेमुक्तीसाठी पालिका २ कोटी ७५ लाख ४० हजार खर्च करणार आहे.
धारावी खड्डेमुक्त होणार; पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती, BMC २ कोटी ७५ लाख ४० हजार रुपये खर्च करणार
धारावी खड्डेमुक्त होणार; पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती, BMC २ कोटी ७५ लाख ४० हजार रुपये खर्च करणारप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर येथील रस्त्यांची पुनर्बाधणी नवीन आराखड्यानुसार होणार आहे. धारावीतील रस्ते खड्डेमुक्तीसाठी पालिका २ कोटी ७५ लाख ४० हजार खर्च करणार आहे.

धारावीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पालिकेकडून रस्त्यांचे काँक्रीटीकरण अथवा नव्याने बांधणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे धारावीत खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे धारावीतील विविध रस्ते व खड्डे मास्टिक अस्फाल्टने बुजविण्याचा निर्णय घेतला आहे.

एसआरएकडून विशेष नियोजन

धारावी पुनर्विकासासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करत आहे. पुनर्विकासाच्या नवीन आराखड्यानुसार धारावीतील सध्याच्या रस्त्यांची रचना बदलणार असल्याने पालिकेला रस्त्यांचे काँक्रीटीकरण किंवा नव्याने बांधणी करता आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या गंभीर बनते. नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदारांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर धारावीसाठी स्वतंत्र निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. अखेर या कामासाठी ३ कोटी ३६ लाखांचे ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. निविदेत व्ही. जे. कार्पोरेशनने ३६.९९ टक्के कमी दराने कामाची तयारी दर्शवली. त्यानुसार जीएसटी, पाणीपट्टी, मलनिःसारण आकार व अन्य शुल्कांसह खर्च २ कोटी ७५ लाख ४० हजार होणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)