Mumbai : लोकलमधून ढकलल्याने दिव्यांग प्रवाशाचा मृत्यू; वांद्रे-माहिमदरम्यान राखीव डब्यात चढल्याने झालेला वाद बेतला जिवावर

लोकल ट्रेनमध्ये बसण्याच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादातून एका दिव्यांग प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Mumbai : लोकलमधून ढकलल्याने दिव्यांग प्रवाशाचा मृत्यू; वांद्रे-माहिमदरम्यानची घटना; राखीव डब्यात चढल्याने झालेला वाद बेतला जिवावर
Mumbai : लोकलमधून ढकलल्याने दिव्यांग प्रवाशाचा मृत्यू; वांद्रे-माहिमदरम्यानची घटना; राखीव डब्यात चढल्याने झालेला वाद बेतला जिवावर
Published on

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये बसण्याच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादातून एका दिव्यांग प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेट-बोरिवली धिम्या लोकलमध्ये वांद्रे आणि माहिम या स्थानकांदरम्यान हा दुर्दैवी प्रकार घडला. कैजेटन डेनिस पेरिस (६२) असे मृत प्रवाशाचे नाव असून ते सांताक्रूझ परिसरात राहत होते. या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अमजद सफ्रिद्दीन शेख (४८) या आरोपीला अटक केली आहे. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. माहिम स्थानकातून पेरिस हे दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढले. आरोपी अमजद शेख हा आधीपासूनच त्या डब्यात आधीपासून होता. तो बोरिवलीच्या दिशेने प्रवास करत होता. पेरिस यांनी अमजद हा सक्षम असतानाही दिव्यांगांच्या डब्यात का प्रवास करतोय, असा प्रश्न विचारला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर वांद्रे खाडीजवळ आरोपीने पेरिस यांना धावत्या ट्रेनमधून बाहेर ढकलून दिले.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या पेरिस यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील प्रवासी सुरक्षेचा आणि विशेषतः दिव्यांगांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने राखीव डब्यांमधील अनधिकृत प्रवाशांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in