अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्समुळे मुंबई विद्रूप; ३१ जणांविरोधात गुन्हा

गेल्या दीड वर्षांत २८,६७७ अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स हटवल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्समुळे मुंबई विद्रूप; ३१ जणांविरोधात गुन्हा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे वेध सर्वपक्षीय नेत्यांना लागले आहेत. मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी बॅनर्स, पोस्टर्सबाजी हा उत्तम पर्याय असला तरी अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्सबाजी करणारे पालिकेच्या परवाना विभागाच्या रडारवर आले आहेत. अनुज्ञापन विभागाने अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्सबाजी करणाऱ्या ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, ७७५ जणांविरोधात न्यायालयीन कारवाई सुरू असल्याची माहिती पालिकेच्या अनुज्ञापन विभागातील अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, गेल्या दीड वर्षांत २८,६७७ अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स हटवल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई महापालिकेकडून बेकायदेशीर बॅनर्स आणि पोस्टर विरोधात कारवाई केली जाते. २०२१मध्ये १६,८३७ बॅनरवर कारवाई करण्यात आली. ९४३ लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यापैकी १८ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे, तर २९० लोकांविरोधात कोर्टात केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तर २०२२ मध्ये जानेवारी ते जुलै या कालावधीत ११,८४० बॅनरवर कारवाई करण्यात आली. ६८१ जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यापैकी १३ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले. तर ४८५ जणांविरोधात कोर्टात केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.

२८,६७७ बॅनरवर कारवाई

गेल्या दीड वर्षांत एकूण २८,६७७ बॅनरवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत १,६२४ तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आल्या असून ३१ एफआयआर नोंदवण्यात आले असून, ७७५ जणांविरोधात कोर्टात केसेस दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या लायसन्स विभागाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in