मुंबई विभागीय रेल्वे कर्मचाऱ्यांचा समूह गट विमा; ३१,४६६ कर्मचाऱ्यांसाठी प्रथमच सामंजस्य करार

समूह मुदत विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई विभागातील कर्मचारी, मध्य रेल्वे आणि एलआयसी ३ नोव्हेंबर रोजी सामंजस्य करार झाला
मुंबई विभागीय रेल्वे कर्मचाऱ्यांचा समूह गट विमा;
३१,४६६ कर्मचाऱ्यांसाठी प्रथमच सामंजस्य करार
Published on

मुंबई : मुंबई विभागीय रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी समुह गट विमा योजना लागू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय ३१ हजार ४६६ कर्मचाऱ्यांना समुह गट विमा योजनेचा लाभ होणार आहे. भारतीय रेल्वेतील ३१,४६६ कर्मचाऱ्यांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि सरकारी क्षेत्रात कदाचित पहिल्यांदाच करार झाला. समूह मुदत विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई विभागातील कर्मचारी, मध्य रेल्वे आणि एलआयसी ३ नोव्हेंबर रोजी सामंजस्य करार झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी होते. यावेळी मुख्य कार्मिक अधिकारी रेणू शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग रजनीश कुमार गोयल आणि एलआयसीच्या कार्यकारी संचालक मंजू बग्गा यांच्यासह एडीआरएम, एलआयसी अधिकारी, शाखा अधिकारी, युनियन आणि असोसिएशनचे अधिकारी उपस्थित होते.

टर्म इन्शुरन्स घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळणार आहे. समुह गट विम्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी भविष्यातील संभाव्य समस्यांपासून दिलासा मिळणार आहे. ग्रुप टर्म इन्शुरन्स प्लॅन वार्षिक नूतनीकरण समूह मुदत विमा योजना आहे.

समुह गट विमा योजना अशी असणार!

या योजनेत कोणतीही वैद्यकीय तपासणी होणार नाही.

या योजनेत, मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यापासून १० दिवसांच्या आत दावा स्वीकारला जातो आणि निकाली काढला जातो.

या योजनेत वयोमर्यादा १८-६० वर्षे निश्चित केली आहे.

या योजनेत आत्महत्या प्रकरणांचा समावेश केला जाईल.

- या योजनेत, प्रत्येक स्लॅबमधील सर्व वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीपर्यंत प्रीमियम समान असेल.

- या योजनेत स्लॅब आणि इतर सुविधांनुसार कर्मचाऱ्यांच्या पगारातून मासिक प्रीमियम कापला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in