Mumbai : दिवाळीत हवेचे 'दिवाळे'! नेव्ही नगरमध्ये AQI ४९७, तर शिवडीत ४५२ वर पोहोचला

दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दोन दिवसांत कुलाबा नेव्ही नगर येथे व्यापक प्रमाणात फटाके फोडण्यात आल्याने येथील हवा गुणवत्ता निर्देशांकाची (एक्यूआय) ४९७ तर शिवडी येथे ४९९ अशी नोंद झाल्याने दिवाळीत मुंबईची हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे उघड झाले आहे.
Mumbai : दिवाळीत हवेचे 'दिवाळे'! नेव्ही नगरमध्ये AQI ४९७, तर शिवडीत ४५२ वर पोहोचला
Mumbai : दिवाळीत हवेचे 'दिवाळे'! नेव्ही नगरमध्ये AQI ४९७, तर शिवडीत ४५२ वर पोहोचलाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : दिवाळीच्या उत्सवात मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरातील हवेचे पुरते दिवाळे वाजल्याचे कटू सत्य उघड झाले आहे. तसेच आगींच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दोन दिवसांत कुलाबा नेव्ही नगर येथे व्यापक प्रमाणात फटाके फोडण्यात आल्याने येथील हवा गुणवत्ता निर्देशांकाची (एक्यूआय) ४९७ तर शिवडी येथे ४९९ अशी नोंद झाल्याने दिवाळीत मुंबईची हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे उघड झाले आहे.

दिवाळीत ६ ते १० नोव्हेंबर या पाच दिवसांत मुंबई अग्निशमन दलाकडे तब्बल ४९९ अग्निकॉलची नोंद झाली. त्यापैकी ३३३ आगींच्या घटना ह्या फटाक्यांमुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच एकूण अग्निकॉलपैकी सुमारे ६७ टक्के घटना फटाक्यांशी संबंधित आहेत. या घटनांमध्ये आठ जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. दिवाळीतील सर्वाधिक धोकादायक दिवस ठरलेल्या ९ नोव्हेंबरला एकाच दिवसात १६६ अग्निकॉल आले. त्यापैकी १४४ घटना फटाक्यांमुळे घडल्या.

रात्रीच्यावेळी प्रदूषण धोकादायक पातळीवर

दिवाळीनिमित्त मुंबईत दिवाळीच्या दिवशी दुपारी मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १३१ असताना फटाक्यांची आतषबाजी सुरू झाल्यानंतर रात्री अनेक भागांतील प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली. नेव्ही नगर येथे एक्यूआय तब्बल ४९७ वर पोहोचला, तर शिवडी येथे ४५२ आणि मानखुर्दमधील शिवाजीनगर येथे ४४४ अशी हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली. घाटकोपर, चकाला आणि चेंबूरमध्येही एक्यूआय ४०० च्या पुढे गेला होता.

नागरिकांनी केला प्रदूषित हवेशी सामना

दिवाळीत सोमवारी, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मुंबईचा सरासरी एक्यूआय १७१ नोंदविण्यात आला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, हा निर्देशांक मध्यम प्रदूषणाच्या श्रेणीत असला तरी शहरातील आठ निरीक्षण केंद्रांवर एक्यूआय २०० च्या पुढे होता. त्यामुळे शहराची सरासरी आकडेवारी तुलनेने कमी दिसत असली, तरी अनेक भागांतील नागरिकांना प्रदूषित हवेशी सामना करावा लागला.

पुढील भागात सर्वाधिक ‘एक्यूआय’ची नोंद

  • नेव्ही नगर - ४९७

  • शिवडी - ४५२

  • शिवाजीनगर, मानखुर्द - ४४४

  • घाटकोपर - ४२१

  • अंधेरी चकाला - ४०८

  • चेंबूर - ४०१

  • बीकेसी - ३६० पर्यंत

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)